घरमहाराष्ट्रJitendra Awhad : मविआबाबत आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना हात जोडून केली विनंती, म्हणाले...

Jitendra Awhad : मविआबाबत आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना हात जोडून केली विनंती, म्हणाले…

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मविआसोबत न जाता एकटे लढण्याचा निर्णय घेतल्याने मविआच्या अनेक नेत्यांकडून याबाबत आपले मत व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील बोलणी फिस्कटली असून आज (ता. 27 मार्च) अखेरीस वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत न जाता ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याचे पाहायला मिळत आहे. पण यामुळे आता मविआमध्ये खळबळ उडाली आहे. कारण आंबेडकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला असला तरी दुसरीकडे मात्र त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली आहे. पण यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांना हात जोडले आहेत. (Jitendra Awhad requested Prakash Ambedkar with folded hands regarding MVA)

हेही वाचा… Sanjay Raut : आंबेडकरांच्या एकला चलो रे भूमिकेवर संजय राऊत म्हणतात, …संविधानाचे दुर्दैव

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मविआसोबत न जाता एकटे लढण्याचा निर्णय घेतल्याने मविआच्या अनेक नेत्यांकडून याबाबत आपले मत व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती आहे की, तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुसस्कर्ते आहात, तुमचे आंबेडकरी विचारांशी रक्ताचे नाते आहे आणि आमचे विचारांचे नाते आहे. त्यामुळे रक्त आणि विचार एकत्र आले की आपण कोणालाही थोपवू शकतो. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा.

तर मी माझी भूमिका मांडली आहे. त्यांना कळत की कळत नाही. हे मी नाही सांगणार. कारण ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत. ते वकील आहेत. त्यांच्या अंगात आंबेडकरांचे रक्त आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. पण शत्रूच्या विचाराशी लढताना एक पाऊल मागे घ्यावे लागते. त्यामुळे आंबेडकरांनी न रागवता याबाबतचा विचार कराव, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती केली आहे. तसेच, जागावाटपाबाबत जे काही तिढे आहेत, ते सर्व तिढे सुटले जातील, असे आव्हाडांकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -