Sunday, April 21, 2024
घरमानिनीReligiousNavratri 2023 : घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नवरात्रीत करा 'हे' उपाय

Navratri 2023 : घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नवरात्रीत करा ‘हे’ उपाय

Subscribe

नवरात्रीच्या दिवसात देवीची पूजा केल्याने घरातील वास्तु दोष देखील दूर होतो. असं मानलं जातं की, ज्या घरांमध्ये आदिशक्ती विराजमान होते. तेथील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते. नवरात्रीच्या दिवसात देवीची पूजा केल्याने घरातील वास्तु दोष देखील दूर होतो. असं मानलं जातं की, ज्या घरांमध्ये आदिशक्ती विराजमान होते. तेथील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

नवरात्रीमध्ये करा ‘हे’ वास्तू उपाय

Chaitra Navratri 2023: If you are unable to fast for nine days on Navratri,  then do this work, you will get the blessings of Maa Durga - Kalam Times

- Advertisement -
  • नवरात्रीच्या काळात घराच्या मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वास्तिक काढा. तसेच या काळात मुख्य दरवाजापासून आतमध्ये देवीच्या पावलांचे ठसे काढा.
  • ज्या घरामध्ये घटस्थापना केली जाते. त्या घरामध्ये नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करायला हवे. त्यावेळी कुमारी कन्यांना खीर, पूरीचे जेवण आणि श्रृंगारातील वस्तू भेट म्हणून दान करा. असं मानले जाते की असं केल्यास देवी तुमच्यावर प्रसन्न होतात आणि घरातील वास्तू दोष देखील दूर होतात.
  • दुर्गा पूजनासाठी जर तुम्ही अखंज ज्योत प्रज्वलित केली असेल तर ही ज्योत घराच्या आग्नेय दिशेकडे ठेवा. वास्तू शास्त्रानुसार, यामुळे घरामधील सर्व दोष दूर होतात. घरातील सदस्यांचे आजारही ठीक होतात.
  • अखंड दिव्यामध्ये तूप किंवा तिळाच्या तेलाचा दीवा लावा. तसेच हा दीवा देवीच्या उजव्या हाताला ठेवा.
  • नवरात्रीच्या काळात घरामध्ये कापूर आणि लवंग एकत्र जाळा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

हेही वाचा :

विजया दशमीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini