घरताज्या घडामोडीNCP : लोकसभेपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर मोठं संकट; दिलीप वळसे पाटलांना गंभीर...

NCP : लोकसभेपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर मोठं संकट; दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुकांसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षश्रेष्टींनी कंबर कसली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुकांसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षश्रेष्टींनी कंबर कसली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. कारण राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे बंडानंतर अजित पवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. (NCP Dilip Walse Patil Injured Due To A Fall In His House)

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया होणार आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात वळसे पाटील यांना केले दाखल केले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अंधारात लाईट सुरू करायला जात असताना पाय घसरुन वळसे पाटील पडल्याची माहिती समोर येत आहे. पाय घसरून पडल्याने त्यांच्या हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील औंध येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 12 ते 15 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहतील असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटलांवर निवडणूकीची मोठी जबाबदारी राष्ट्रवाजीकडून टाकण्यात आली आहे. शिरुरचे अजित पवार गटाचे आमदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर आहे. मात्र अचानक वळसे पाटील हे दुखापतग्रस्त झाल्याने राष्ट्रवादीसमोर मोठं संकट उभे राहिले आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. यासाठी टप्प्याटप्प्यात उमेदवारांच्या यादीही जाहीर केली जात आहे. त्याचसोबत स्टार प्रचारकांच्याही यादी जाहीर केली जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे.


हेही वाचा – NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अजित पवारांसह 37 जणांचा समावेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -