Monday, April 29, 2024
घरमानिनीप्रत्येक महिलेला माहीत असाव्यात 'या' 5 गुप्त गोष्टी

प्रत्येक महिलेला माहीत असाव्यात ‘या’ 5 गुप्त गोष्टी

Subscribe

महिलांमध्ये मुलांना जन्म देण्याची क्षमता असते. त्यामुळेच त्यांनी आपल्या सेक्शुअळ अॅन्ड रिप्रोडक्टिव सिस्टिमची काळजी घेणे सुद्धा फार महत्वाचे आहे. खरंतर ही सिस्टिम प्रजनन करण्यासारखे कठीण काम करते. परंतु वास्तवात ती अगदी संवेदनशील असते. अशातच त्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महिलेला काही महत्वाचे उपाय करावे लागतात.

-नियमित स्वच्छता करावी

- Advertisement -


आज सुद्धआ ७५ टक्क्यांपेक्षा अधिक महिला आपल्या प्रायव्हेट पार्टची योग्य प्रकारे काळजी घेत नाही. खरंतर त्याची स्वच्छता करणे फार महत्वाचे असते. त्यासाठी तुम्ही सिंथेटिक अंडरगार्मेंट्स घालणे टाळा. तसेच मासिक पाळीदरम्यान प्रत्येक ४ तासांनी पॅड बदलावे.

-रेग्युलर स्क्रिनिंग टेस्ट करा

- Advertisement -


आपल्या स्री रोग विशेषतज्ञांकडे नियमित रुपात गेल्याने काही समस्यांबद्दल कळू येते. या दरम्यान तुमच्या मासिक पाळीबद्दल ही तुम्हाला विचारले जाईल या व्यतिरिक्त वयाच्या २१ व्या वर्षावरील मुलींनी वर्षातच २ वेळा पॅप स्मीयर टेस्ट करावी. यामुळेच सर्वाइकल कॅन्सर अशा गंभीर आजाराबद्दल कळू शकते.

-सेक्शुअल ट्रांन्समिटेड इन्फेक्शन


हे अशा प्रकारचे इन्फेक्शन आहे जे सेक्शुअल अॅक्टिव्हिटी दरम्यान जननेंद्रियाच्या संपर्कामुळे फैलावतात. हे एका गर्भवती महिलेकडून तिच्या मुलामध्ये ही होऊ शकते. यामध्ये गोनोरिया, क्लॅमाइडिया सारखे सामान्य संक्रमण अथवा सिफलिस, एचआयवी हेपेटाइस सारखे अधिक गंभीर संक्रमणाचा समावेश आहे.

-शारिरीक संबंधावेळी कंडोम वापरा


पार्टनर सोबत शारिरीक संबध करताना आरोग्यासंबंधित समस्येपासून दूर राहण्यासाठी कंडोमचा वापर करावा. तसेच अनेकांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यापासून दूर रहा. या व्यतिरिक्त शारिरीक संबंध करताना सेक्शु्अल पार्टनरची तपासणी करावी. जेणेकरुन हे सुनिश्चित होईल की, त्याला कोणत्याही प्रकारचे इंन्फेक्शन नाही.

-गर्भनिरोधक ऑप्शन बद्दल जाणून घ्या


खरंतर कंडोम वापरणे हे कोणत्याही साइट इफेक्टच्या एसटीआय आणि अनवॉन्टेड प्रेग्नेंसीपासून बचाव करतो. परंतु जे कपल्स कंडोम वापरत नाही त्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात. परंतु याचा सातत्याने वापर करु नये. याचा परिणाम महिलेच्या हार्मोन्सवर परिणाम होतो. तसेच काही महिला याला रेग्युलर बर्थ कंट्रोल पिल्स समजतात. पण असे समजण्याची चूक महिलांनी करु नये.


हेही वाचा- वयाच्या चाळीशीनंतर ही होऊ शकता आई-बाबा

- Advertisment -

Manini