घरताज्या घडामोडीआकांकडून पाठ थोपटून घेण्यासाठी खर्गेंची उतरत्या वयात धडपड - चित्रा वाघ

आकांकडून पाठ थोपटून घेण्यासाठी खर्गेंची उतरत्या वयात धडपड – चित्रा वाघ

Subscribe

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. पंतप्रधान मोदींबद्दल खर्गेंनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाच्या नेत्यांकडून हल्लाबोल केला जात आहे. अशातच आता भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. पंतप्रधान मोदींबद्दल खर्गेंनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाच्या नेत्यांकडून हल्लाबोल केला जात आहे. अशातच आता भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही हल्लाबोल केला आहे. ‘मोदीजींना शिव्या घालून आपल्या आकांकडून पाठ थोपटून घेण्याची केविलवाणी धडपड उतारत्या वयात खर्गेंना करावी लागतेय हे दुर्देवी आहे’, असा शब्दांत चित्रा वाघ यांनी खर्गेंवर टीका केली. (BJP Leader Chitra Wagh Slams Congress Leader Mallikarjun Kharge)

चित्रा वाघ यांचे ट्वीट

- Advertisement -

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर टीका केली. “गांधी घराण्याची गुलामी करणारे मल्लिकार्जुन खर्गे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काहीतरी बरळले. मोदीजींना शिव्या घालून आपल्या आकांकडून पाठ थोपटून घेण्याची केविलवाणी धडपड उतारत्या वयात खर्गेंना करावी लागतेय हे दुर्देवी आहे”, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

“खरं विष कांग्रेसनं पेरलं ते म्हणजे भ्रष्टाचाराचं जातीपातीचं घराणेशाहीचं. 2G घोटाळा, बोफोर्स घोटाळा आणि कोळसा घोटाळा करून तोंड काळं करणा-यांनी शहाणपणा शिकवू नये”, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

- Advertisement -

काय म्हणाले होते खर्गे?

कलबुर्गी येथील जाहीर सभेला संबोधित करताना मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. ‘पंतप्रधान मोदी हे… सारखे आहेत. तुम्ही विचार करू शकता की, ते विष आहे की नाही? जर तुम्ही ते (विष) खाल्ले तर तुम्ही मराल’, असे आक्षेपार्ह वक्तव्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.


हेही वाचा – ‘त्या’ प्रकरणी सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -