Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthपाण्यामुळे 'ही' हाड होऊ शकतात ठिसूळ...

पाण्यामुळे ‘ही’ हाड होऊ शकतात ठिसूळ…

Subscribe

मध्य प्रदेशतील भिंडमधील स्टेशनपुरा या गावातील लोकांना हाडांच्या समस्यांचा समाना करत आहेत. या गावातील लोकांना हाडांच्या आजारामुळे (Bone Diseases) ना बघायला, मान फिरवता येत ना, जमिनीवर बसता येते. या गावातील लोकांना खराब पाण्यामुळे हाडांचा आजार झाल्याचे बोलले जाते. या गावच्या गाण्यात कॅल्शियम कमी असल्यामुळे लोक हाडांचा आजारी झाल्याचे लक्षात आले आहे.

काही वेळीस शरीरात पोषक तत्व किंवा कमी वजन यासारक्या प्रॉब्लम होतात. काही वेळी पाण्यामुळे देखील हाडांचा आजार होऊ शकतो. यासंदर्भात आजारासंदर्भात आपण आज जाणून घेऊ या.

- Advertisement -

 

प्रश्न: हाडे मजबूत असणे महत्त्वाचे का आहे?

- Advertisement -

उत्तर: शरीराचा संपूर्ण भार हा हाडांच्या संरचनेवर अवलंबून असतो. त्यामुळे हाडे मजबूत आणि निरोगी असणे हे तितकेच महत्त्वाचे आहे.

शरीराला आधार आणि आकार देण्याव्यतिरिक्त, हाडांचे कार्य मेंदू आणि फुफ्फुसांचे संरक्षण करणे आहे.

प्रश्न: माझी हाडे कमकुवत आहेत हे मला कसे कळेल?

उत्तर : वयामुळे आणि अनेक वेळा आजारांमुळे हाडांची ताकद कमी होऊ लागते. बहुतेक लोक 30 वर्षांच्या वयानंतर हाडांचे मास (घनता) कमी होऊ जाते. त्यामुळे हाडे कमकुवत होतात.

तुमचे शरीर काही संकेत देते जे सूचित करतात की, हाडे कमकुवत होत आहेत. त्यांना ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. याबद्दलची माहिती खाली क्रिएटिव्हमध्ये दिली आहे.

प्रश्न: कोणत्या-कोणत्या कारणांमुळे हाडे कमकुवत होतात?

उत्तरः चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्या हाडांचे नुकसान होते. त्यामुळे ते अशक्त होतात.

  • खाण्यापिण्यात जास्त प्रथिने घेणे.
  • सूर्यप्रकाशाचा कमी संपर्क
  • जास्त गोड पदार्थ खाणे
  • भरपूर मीठ घालून पदार्थ खाणे.
  • सोडा आणि कॅफीन पिणे.
  • दररोज अल्कोहोलचे सेवन.
  • निष्क्रिय जीवनशैली जगणे म्हणजे स्वतःला तंदुरुस्त न ठेवणे.
  • अन्नातून पुरेसे कॅल्शियम मिळत नाही.

 

प्रश्न: चांगली हाडे कमकुवत होण्यासाठी पाणी कसे जबाबदार असे शकते?

उत्तर: पाण्यामध्ये कॅल्शियम नसल्याने हाडे कमकुवत होतात.

भूजलातील पाण्यात युरियाचे प्रमाण वाढल्याने हाडे कमकुवत होऊ शकतात.

पाण्यात कोणत्याही प्रकारचे रेडिएशन असल्यास हाडांवर परिणाम होतो.

पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यास फ्लोरोसिस रोग होतो.

प्रश्न: आता तुम्ही फ्लोरोसिस रोगाचा उल्लेख केला आहे, तो काय आहे?

उत्तरः फ्लोरोसिस हा हाडांचा धोकादायक आजार आहे. हा आजार पाणी पिण्याने होतो. जेव्हा पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असते आणि लोक अनेक वर्षे असे पाणी पितात तेव्हा त्यामुळे फ्लोरोसिस रोग होतो.

  • फ्लोरोसिसची लक्षणे
  • दात पिवळे होतात
  • स्नायू आणि हाडे दुखतात
  • हाडे वाकडी होतात
  • पिण्याचे पाणी तपासणे करणे गरजेचे

घरच्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण तपासा. 1 लिटर पाण्यात फ्लोराईड 1 मिलीग्रामपेक्षा जास्त असेल तर ते पाणी पिऊ नये. किंवा आरओचे पाणी प्या. चाचणीसाठी मशिन्स बाजारात उपलब्ध आहेत.

 

प्रश्‍न: हाडे चांगली नसल्यामुळे कोणता आजार होण्याचा धोका असतो?

उत्तर: साधारणपणे खालील 6 आजार होण्याचा धोका असतो.

  • ऑस्टिओपोरोसिस
  • संधिवात
  • हाडांचा कर्करोग
  • हाडांची घनता कमी होणे
  • हाडांचा संसर्ग
  • मुलांमध्ये मुडदूस

 


हेही वाचा – लठ्ठपणा बनू शकतो तुमच्या Sex Life चा शत्रू

- Advertisment -

Manini