घरदेश-विदेशPolitics : काँग्रेसमध्ये पुन्हा राजकीय भूकंप? मध्य प्रदेशातही काँग्रेसला धक्का; बड्या नेत्याच्या...

Politics : काँग्रेसमध्ये पुन्हा राजकीय भूकंप? मध्य प्रदेशातही काँग्रेसला धक्का; बड्या नेत्याच्या मुलाने बदललं प्रोफाईल

Subscribe

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे सगळीकडेच मतांची जुळवाजुळव सुरू आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला एकावर एक धक्के बसताना दिसत आहेत. काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी नुकताच पक्ष सोडला आहे. त्यातच काँग्रेसला आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पार्टीचे नेता कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्रोफाईलवरुन काढले आहे.

कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुलनाथ हे पाच दिवसांच्या छिंदवाडा दौऱ्यावर जाणार होते. पण, त्यांनी तो रद्द करुन अचानक दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते दिल्ली दौऱ्यावर आहेत. नकुलनाथ काँग्रेस सोडतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच त्यांनी पक्ष सोडला तरी कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत प्रश्न कायम आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आंदोलन चिघळले; आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाहनाची तोडफोड

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र काँग्रेस नेता आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी खासदार, केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा हे दोन बडे नेते अनुक्रमे भाजप आणि शिवसेनेत आले. या दोघांनाही राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.

- Advertisement -

कमलनाथ यांच्यासोबत 10 आमदार?

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. कमलनाथ यांच्यासोबत दहा आमदार आणि तीन महापौरही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांच्यासोबत त्यांचा मुलगा खासदार नकुलनाथही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले ?

मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांनी कमलनाथ यांच्या भाजप पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, जर मध्यप्रदेशमधील कोणता नेता समजहितासाठी आमच्यासोबत येत असेल तर त्यांचं स्वागत आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : “अजित पवारांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतोय”, शरद पवारांचा आरोप

दिग्विजय सिंहांनी नाकारले

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर हल्लाबोल केला. ज्यांना भीती वाटत आहे तेच लोक जात आहेत. कमलनाथ यांच्याशी माझं कालच बोलणं झालं आहे. ते छिंदवाडामध्ये आहेत. ते कधीही भाजपमध्ये जाणार नाहीत. ज्या व्यक्तीने नेहरु कुटुंबियांसोबत काम केलं आहे. तो व्यक्ती असं करू शकत नाही, असं ते म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचे समर्थक बरेच आहेत. कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर ऐन लोकसभा निवडणुकीआधी हा काँग्रेसला मोठा फटका असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -