घरदेश-विदेशRahul Gandhi: 'तुम्ही जय श्री राम म्हणावं आणि उपाशी मरावं, अशी मोदींची...

Rahul Gandhi: ‘तुम्ही जय श्री राम म्हणावं आणि उपाशी मरावं, अशी मोदींची इच्छा’, राहुल गांधी असं का म्हणाले?

Subscribe

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. (Rahul Gandhi Why did Rahul Gandhi say that Modi wants you to say Jai Shri Ram and starve to death)

तुम्ही दिवसभर जय श्री राम म्हणावे आणि उपाशी मरावे, अशी मोदींची इच्छा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदी आणि जय श्री रामच्या घोषणा दिल्याने राहुल गांधी यांच्यासाठी अस्वस्थ परिस्थिती निर्माण झाली.

- Advertisement -

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधींचा ताफा भारत जोडो न्याय यात्रेत जात असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्यांचा ताफा पाहताच समोरून अनेक भाजप कार्यकर्ते मोदी-मोदीच्या घोषणा देऊ लागले. या घोषणा ऐकून राहुल गांधी गाडीतून खाली उतरले आणि त्यांच्याकडे गेले.

व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, हे भाजप कार्यकर्ते राहुल गांधींना बटाटे देतात आणि राहुल त्यांच्याकडून बटाटे घेतात. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बटाटे घ्या आणि सोने द्या, असे सांगितले.

- Advertisement -

2016 मध्ये राहुल गांधींनी गुजरातमधील पाटणमध्ये भाषण केले होते. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मी असे मशीन बसवतो, या बाजूने बटाटे आत जातील आणि त्या बाजूने सोने बाहेर येईल, असे ते कथितपणे ऐकू आले.

मात्र, नंतर व्हिडिओशी छेडछाड करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे उघड झाले.

राहुल गांधी म्हणाले की, पूर्वी देशातील तरुण जेव्हा सैन्यात भरती व्हायचे तेव्हा लष्कर त्यांच्या संरक्षणाची हमी देत असे. सैनिक शहीद झाला तर त्याला शहीद दर्जा मिळतो. आता मोदी सरकारने अग्निवीरला सैन्यात आणल्याने सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या वेळी देशातील दीड लाख तरुणांची सैन्यात निवड झाली, मात्र तीन वर्षानंतरही ते रुजू झालेले नाहीत. आता त्यांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. अखेर या दीड लाख तरुणांची चूक काय होती? असा सवालदेखील विचारला आहे. शेतकऱ्यांबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले आहेत की, देशात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक वर्गातील सुमारे 90 टक्के लोक आहेत.

(हेही वाचा: Himachal politics : काँग्रेसचे 6 बंडखोर आमदार सुप्रीम कोर्टात, अपात्रतेच्या निर्णयाला आव्हान)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -