घरदेश-विदेशBhopal Fire: भोपाळमधील मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Bhopal Fire: भोपाळमधील मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Subscribe

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील वल्लभ भवनच्या (मंत्रालय) तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली.

भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील वल्लभ भवनच्या (मंत्रालय) तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट दूरवरून दिसत आहेत. इमारतीच्या चार मजल्यापर्यंत आग पसरली आहे. मंत्रालय इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Bhopal Fire A massive fire broke out at the ministry building in Bhopal many important documents were burnt)

तिसऱ्या मजल्यावर ठेवलेल्या जुन्या फाइल्स आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

- Advertisement -

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी अरेरा हिल्स येथील वल्लभ भवन (मंत्रालय) च्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच मंत्रालयाच्या इमारतीत एकच गोंधळ उडाला. गेट क्रमांक 5 आणि 6 मधील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील आग विझवण्यात यश

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. झोन-2 च्या डीसीपी श्रद्धा तिवारी यांनी सांगितले की, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, तर चौथ्या मजल्यावरील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले सीएम मोहन यादव?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भोपाळ येथील वल्लभ भवन राज्य सचिवालयाला लागलेल्या आगीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘वल्लभ भवनच्या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे माझ्या माहितीत आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मी सीएसला त्यावर देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. अशी कोणतीही घटना पुन्हा घडू नये, यासाठी आम्ही सूचना दिल्या आहेत. अशी घटना पुन्हा होणार नाही अशी आशा आहे.

वल्लभ भवन हे राज्य सरकारचे सर्वात मोठे कार्यालय आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची कार्यालये येथे आहेत. सरकारी खात्यांची अनेक कागदपत्रेही येथे वल्लभ भवनात ठेवण्यात आली आहेत.

(हेही वाचा: Politics: स्वत:ला स्वाभिमानी म्हणवणारे आता दिल्लीत भांडी घासतायत; राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंसह अजित दादांवर घणाघात )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -