घरताज्या घडामोडीMP : वडिलांपेक्षा मुलगा संपत्तीत सवा शेर; काँग्रेस उमेदवार नकुल नाथ यांनी...

MP : वडिलांपेक्षा मुलगा संपत्तीत सवा शेर; काँग्रेस उमेदवार नकुल नाथ यांनी जाहीर केली 700 कोटींची संपत्ती

Subscribe

देशपातळीवर यंदाच्या लोकसभा निवडणुतील इंडिया विरुद्ध एनडीए यांच्यात लढत होणार आहे. आतापर्यंत काँग्रेस, भाजपासह इतरही प्रादेशिक पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. अशात मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सुपुत्र नकुल नाथ हे राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मध्य प्रदेशच्याछिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून नकुल नाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भोपाळ : देशपातळीवर यंदाच्या लोकसभा निवडणुतील इंडिया विरुद्ध एनडीए यांच्यात लढत होणार आहे. आतापर्यंत काँग्रेस, भाजपासह इतरही प्रादेशिक पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. अशात मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सुपुत्र नकुल नाथ हे राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मध्य प्रदेशच्याछिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून नकुल नाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, अर्जासोबत त्यांनी वैयक्तिक माहितीसह पार्श्वभूमी आणि संपत्तीचं विवरणही जोडले आहे. त्यानुसार, नकुल नाथ यांच्याकडे 700 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. (MP Kamal Nath son Nakul nath wealth is 700 crores Congress in the Lok Sabha)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सुपुत्र नकुल नाथ यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत 40 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रोकड, शेअर्स आणि बाँडसह 649.51 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. तर, 48.08 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता नकुल नाथ यांनी निवडणूक आयोगाकडील विवरण पत्रात घोषित केली आहे.

- Advertisement -

कलमनाथ यांचे सुपुत्र नकुल नाथ हे मागील लोकसभा 2019 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत नकुल नाथ यांना भाजपाच्या विवेक साहू यांचे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नकुल नाथ हे करोडपती खासदारांच्या यादीत अव्वल स्थानावर होते. एडीआर म्हणजेच असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार नकुल नाथ यांनी 2019 मध्ये 660 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.

माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांची संपत्ती 134 कोटी एवढी आहे. त्यामुळे, वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती 5 पटीने अधिक आहे. विशेष म्हणजे कमलनाथ यांनी याच छिंदवाडा मतदारसंघातून 9 वेळा विजय मिळवला आहे. तर, त्यांच्या मुलाने गतवर्षी पहिल्यांदाच येथून खासदारकी मिळवली.

- Advertisement -

दरम्यान, लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात ज्या मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. त्याठिकाणी उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातील विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे, नितीन गडकरींसह विदर्भातील बड्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


हेही वाचा – MUKHTARANSARI : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -