घरक्रीडाजबरा फॅन : लग्नपत्रिकेवर स्वत:ऐवजी छापला धोनीचा फोटो, संपूर्ण संघाला दिले लग्नाचे आमंत्रण

जबरा फॅन : लग्नपत्रिकेवर स्वत:ऐवजी छापला धोनीचा फोटो, संपूर्ण संघाला दिले लग्नाचे आमंत्रण

Subscribe

नवी दिल्ली : सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतात आणि ते त्याच्या कृतीतून आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी किंवा त्याचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यासाठी असे काहीतरी करतात की ते शोसल मीडियावर व्हायरल होतात. अशाच एका चाहत्याने भारताचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी असे काही तरी केले आहे की, तो व्हायरल झाला आहे. छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या एका चाहत्याचे लवकरच लग्न होणार आहे. त्याने आपल्या लग्नपत्रिकेवर धोनीचा फोटो छापला आहे. त्यामुळे लग्नपत्रिका प्रचंड व्हायलर होत आहे. (Jabara fan Dhoni’s photo was printed instead of himself on the wedding card, the entire team was invited to the wedding in marathi)

आपण अनेक आपल्या नातेवाईकांची किंवा मित्रमंडळींची लग्नपत्रिका पाहिला आहे. त्या लग्नपत्रिकेवर नवरदेव-नवरीचे नाव, त्यांच्या आईवडिलांचे नाव, नातेवाईकांचे नाव, लग्नाची तारीख, लग्नाचे ठिकाण आणि वेळ या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. याशिवाय सध्याच्या काळात वेळवेगळ्या रंगाच्या, डिझाईनच्या लग्नपत्रिका पाहायला मिळतात. परंतु यातील काही लग्नपत्रिकाच  सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यांची चर्चा होताना दिसते. आजवर आपण बहुतेक लग्नपत्रिकांवर नवरा-नवरीचे फोटो पाहिले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीने आपल्या लग्नाच्या पत्रिकेवर दुसऱ्याचा फोटा छापलेला कधी पाहिला नाही आणि असा फोटो कोणी छापेल असा विचारही करू शकत नाही. मात्र छत्तीसगडच्या दीपक पटेल याने महेंद्रसिंग धोनीचा फोटा लग्नपत्रिकेवर लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

- Advertisement -

छत्तीगडच्या मिलुपाराच्या कोंडकेल जिल्ह्यातील रहिवासी असलेला दीपक हा लहानपणापासूनच धोनीचा जबरा फॅन आहे. तो धोनीला आपला आदर्श मानतो. त्यामुळेच त्याने आपल्या लग्नपत्रिकेवर धोनीचा फोटो छापल्याचे सांगितले जात आहे. दीपकने आपल्या लग्नपत्रिकेवर महेंद्रसिंह धोनीचा फोटो छापला आहे. यासोबतच त्याने धोनीचे नाव आणि त्याचा जर्सी नंबरही छापला आहे. तो ऐवढ्यावरच थांबला नाही त्याने आपल्या लग्नासाठी धोनीला येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्याच्या या धोनी प्रेमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

लग्नपत्रिकेविषयी माहिती
दीपक पटेल याची लग्नपत्रिका पिवळ्या रंगाची आहे. त्याने पत्रिकेच्या एका बाजूला मोठ्या स्वास्तिक चिन्हात गणपतीचा फोटो छापला आहे. दुसऱ्या बाजूला सात नंबरचा आकडा छापण्यात आला असून या नंबरमध्ये त्याने धोनीचा फोटो आहे. सात नंबरच्या वरती धोनी आणि खाली थाला असे लिहिण्यात आले आहे. स्वास्तिक चिन्हाच्या खाली शुभविवाह आणि त्या बाजूला दीपक आणि गरिमा असे लिहिले आहे. या दोघांच्या नावाखाली लग्नाची तारीख बुधवार 7 जून लिहिली आहे. लग्नपत्रिकेच्या दुसऱ्या बाजूला पिवळ्या रंगावर निळ्या वर्तुळात सात नंबर लिहून बाजूला धोनीचा फोटो आणि फोटोच्या खाली थाला असे लिहिले आहे. त्याने धोनीसह संपूर्ण चेन्नई सुपर किंग्ज संधाला लग्नाचे आमंत्रण दिले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -