Thursday, September 21, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious krishna janmashtami 2023 : 'या' दिवशी साजरी केली जाणार कृष्णाष्टमी; वाचा शुभ...

krishna janmashtami 2023 : ‘या’ दिवशी साजरी केली जाणार कृष्णाष्टमी; वाचा शुभ मुहूर्त आणि तिथी

Subscribe

श्रावण महिना सुरू झाला की नागपंचमी आणि रक्षाबंधननंतर कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्वपूर्ण मानले जाते. कारण या दिवशी भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. यावर्षी 6 आणि 7 सप्टेंबर रोजी कृष्णाष्टमी साजरी केली जाईल.

कृष्णाष्टमी तिथी

Top 20 Beautiful Lord Krishna Images - Wordzz

- Advertisement -

कृष्ण जन्माष्टमी – 6 सप्टेंबर 2023 , बुधवार
अष्टमी तिथी प्रारंभ : 6 सप्टेंबर 2023, दुपारी 03:37 पासून
अष्टमी तिथी समाप्ती : 7 सप्टेंबर, संध्याकाळी 04:14 मिनीटपर्यंत

कृष्ण जन्माष्टमी शुभ मुहूर्त– 6 सप्टेंबर रात्री 11:57 पासून 7 सप्टेंबर मध्यरात्री 12:42 पर्यंत असेल. या 46 मिनिटांच्या कालावधीत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल.

- Advertisement -

दही हंडी–  गुरुवार, 7 सप्टेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल.

अशा प्रकारे करा श्रीकृष्णाची पूजा

Premium Photo | Bal krishna laddu gopal brass statue with beautiful pink cloths and jewelry krishna janmashtami

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी.
  • त्यानंतर श्रीकृष्णांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा.
  • अभिषेक करताना ‘क्लीं कृष्णाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
  • त्यानंतर श्रीकृष्णांच्या मूर्तीला जलाभिषेक करावा.
  • जलाभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पाळण्यात ठेवावी.
  • गंध, अत्तर , पुष्प, धूप, दीप, तुळस आणि लाडवाचा नैवेद्य त्यांना अर्पण करावा. श्रीकृष्णांची आरती करावी.
  • कृष्णाष्टमीच्या दिवशी रात्री श्रीकृष्णांची विशेष पूजा करावी.

हेही वाचा :

आज श्रावणातला तिसरा सोमवार; शिवपिंडीवर अर्पण करा ‘ही’ शिवामूठ

- Advertisment -

Manini