देवाची आरती करताना असो किंवा उत्साहाच्या क्षणी टाळ्या या आपसुकच वाजवल्या जातात. मानवी शरीरात 34 प्रेशर पॉईन्ट्स असतात. त्यांपैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. त्या प्रेशर पॉईंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास देखील याची मदत होते.
त्यामुळे सकाळच्या वेळेस 20-30 मिनिटे टाळया वाजवल्यास तुम्ही फीट आणि अॅक्टीव्ह राहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्टेरॉलचा त्रासही कमी होतो अशी माहिती वैद्यकीय संशोधनातून समोर आली आहे. टाळी वाजवल्यानंतर अॅक्युपंचर पॉईंटला चालना मिळते.
- Advertisement -
टाळ्या वाजवण्याचे फायदे
- हृद्याच्या आणि फुफ्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थम्याचा त्रासही कमी होतो.
- पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.
- गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.
- लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.
- टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.
- क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.
- Advertisement -
- क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.
- क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.
- मधुमेह, अर्थ्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश,केसगळती, डोळ्यांचे विकार यासारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते.
- सतत एसीमध्ये बसणारे आणि काम करणार्यांमध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.
हेही वाचा :