Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyDiwali 2023 : यंदा दिवाळीत घरीच तयार करा सुगंधी उटणे

Diwali 2023 : यंदा दिवाळीत घरीच तयार करा सुगंधी उटणे

Subscribe

दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा पूर्वीपासून सुरु आहे. पूर्वीचे लोक घरच्या घरी पारंपारिक पद्धतीने उटणं तयार करायचे. मात्र, अलीकडे लोक बाजारातून उटणं खरेदी करतात. परंतु तुम्ही देखील घरच्या घरी स्वच्छ आणि सुवासिक उटणे तयार करु शकता.

साहित्य :

  • बेसन 2 चमचे
  • चंदन पावडर 2 चमचे
  • हळद पावडर 1/2 चमचा
  • चिमुटभर भीमसेन कापूर
  • पाणी / गुलाबजल / दूध (यापैकी एक वापरा)

कृती :

Abhyanga Snan On First Day Of Diwali Special Herbal Bath With Ubtan Or Utne A Mix Herbal Powder To Have Bath And Scrub On The Occasion Of Diwali Selective Focus Stock Photo - Download Image Now - iStock

- Advertisement -

सर्वप्रथम बेसन, चंदन पावडर, हळद पावडर आणि कापूर यांचे पाणी अथवा गुलाबजल अथवा दूध वापरून थोडे घट्ट मिश्रण बनवा. ते एकसारखे तुमच्या चेहऱ्यावर आणि हातापायांवर लावा. 10-15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुवून काढा.

 

- Advertisement -

हेही वाचा :

Diwali 2023 : दिवाळीआधी घरातून ‘या’ वस्तू बाहेर काढल्याने नांदेल सुख-समृद्धी

- Advertisment -

Manini