घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका

Subscribe

जळगाव :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना हृयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली आहे. एकनाथ खडसेंची मुलगी रोहिणी खडसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. यानंतर मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची सोय केली होती. एकनाथ खडसेंना एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने उपचारासाठी जळगावहून मुंबईला आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

एकनाथ खडसेंना आज दुपारी छातीमध्ये दुखू लागले होते. यानंतर एकनाथ खडसेना जळगावच्या गजानन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर एकनाथ खडसेंना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे कळाले होते. यानंतर एकनाथ खडसेंना पुढील उपचारासाठी मुंबईला आणण्यात येणार आहे. यासाठी एकनाथ खडसेंची मुलींने मुख्यमंत्र्यांना फोन केल्यानंतर त्यांनी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – ड्रग्ज प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार यांचे काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप, म्हणाले…

सध्या मुख्यमंत्री हे साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहे. मुख्यमंत्र्यांना एकनाथ खडसेंच्या प्रकृतीची माहिती मिळल्यानंतर एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्थेचे आदेश दिले. आज सायंकाळी 7. 30 वाजता एकनाथ खडसेंना पुढील उपचारासाठी जळगावहून मुंबईत आणण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -