घरदेश-विदेशलोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये! दावा करताना ममता बॅनर्जी यांनी दिले कारण...

लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये! दावा करताना ममता बॅनर्जी यांनी दिले कारण…

Subscribe

कोलकाता : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाविरोधात ‘इंडिया’ या नावाने एकजूट दाखवली आहे. या नव्या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाची टिप्पणी केली आहे. या निवडणुका पुढीलवर्षी न होता, याच वर्षी डिसेंबरमध्ये होतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

- Advertisement -

केंद्रीतील मोदी सरकारची ही दुसरी टर्म सुरू असून पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) विजय होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून व्यक्त केला आहे. तर, या विरोधात विरोधकांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन केली असून तिचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्याची तिसरी बैठक मुंबईत येत्या गुरुवार आणि शुक्रवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी, केंद्र सरकार डिसेंबरमध्येच लोकसभा निवडणुका घेऊ शकते, असा दावा केला आहे. भाजपाने निवडणूक प्रचारासाठी सर्व हेलिकॉप्टर्स आधीच बुक केले असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

हेही वाचा – दुखापत गंभीर स्वरुपाची नसली तरी, हत्येच्या प्रयत्नाचा आरोपी दोषीच – सुप्रीम कोर्ट

- Advertisement -

तृणमूल काँग्रेस युवा आघाडीच्या रॅलीला त्या संबोधित करत होत्या. भाजपा डिसेंबर 2023पर्यंत लोकसभेच्या निवडणुका घेऊ शकतात. भाजपाला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाली तर देश हुकूमशाहीकडे जाईल, असे सांगून त्या म्हणाल्या, भाजपाने लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. प्रचारासाठी त्यांनी सर्व हेलिकॉप्टर बुक केले आहेत. इतर पक्षांना हेलिकॉप्टर मिळू नये म्हणून हे करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – कर्नाटकहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात थांबला दोन वर्षीय चिमुकलीचा श्वास; ‘ते’ पाच जण बनले देवदूत

काहीजण बेकायदेशीर कामात गुंतले आहेत. फटाक्याचे कारखाने बेकायदेशीरपणे चालवले जात असून, त्यात स्फोटही झाले आहेत. काही पोलिसांच्या आशीर्वादाने हे सर्व होत आहे. भाजपाने आधीच देशभरात विविध समाजांमध्ये द्वेषभावना पसरवली आहे. आता ते सत्तेत परतले तर देश द्वेषाने भरून जाईल, अशी टीका त्यांनी केली. पण त्याचबरोबर, बंगालमधून तीन दशकांची माकपा राजवट संपुष्टात आणली होती आणि आता लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -