घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : अजित पवारांची पदाधिकाऱ्यांना तंबी, म्हणाले - मी कोणाचे...

Lok Sabha 2024 : अजित पवारांची पदाधिकाऱ्यांना तंबी, म्हणाले – मी कोणाचे ऐकून घेणार नाही

Subscribe

महायुतीचा धर्म पाळलाच पाहिजे. ही देशाची निवडणूक आहे, लक्षात ठेवा, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.

पुणे : आपली महायुती आहे आणि त्यामुळे आपण महायुतीचा धर्म पाळलाच पाहिजे. ही देशाची निवडणूक आहे, लक्षात ठेवा, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. पक्षातील नाराजीच्या चर्चांमुळेच भर कार्यक्रमात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना ही तंबी दिल्याचे बोलले जात आहे. मावळ लोकसभेत महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे या संदर्भातील महायुतीची समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली होती. याच बैठकीत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. (Lok Sabha Election 2024 Ajit Pawar warns to Party Workers)

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जात आहेत. त्याला काही अर्थ नाही. विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका. परत म्हणाल दादा (अजित पवार) फक्त गप्पा मारायला गेलो होतो. मी तसले काही ऐकून घेणार नाही. आपली महायुती आहे, महायुतीचा धर्म पाळायला हवा. मैत्री, नाते-गोते, भावकी-रावकी बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाची आहे, लक्षात ठेवा, असे थेटपणे सांगत अजित पवारांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… NCP SP : जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला राग अन् सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

तसेच, विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असे सांगेल की, अजित पवारांनी मला उभे राहायला सांगितले आहे. असे अजिबात नाही. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, मी असे काही करत नाही. आपले उमेदवार हे श्रीरंग बारणे आहेत, धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका, असेही उपमुख्यमंत्री स्पष्टपणे सांगण्यात आले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. विकासाची वज्रमुठ बांधून आपल्याला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. ही निवडणूक विचारांची नाही तर विकासाची आहे. 140 कोटींमध्ये 70 कोटी महिला आहेत. आता प्रत्येक महिलांच्या खात्यात एक लाख टाकायची गॅरंटी द्या म्हणतात. आता मला सांगा असे केलं तर भारत जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश होईल. विरोधक बोलायचे म्हणून काहीही बोलत आहेत, असा टोला अजित पवारांनी लगावला.

तर, विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करतात. विरोधक नको त्या मुद्द्यांवरून बोलताना पाहायला मिळत आहेत. त्याला काही अर्थ नाही. इंदिरा गांधींकडून 28 वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली आहे. तर मोदींकडून सहा वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे घटना दुरुस्ती आणि त्यातील बदल समजून घ्या, असेही अजित पवारांकडून यावेळी सांगण्यात आले.

Lok Sabha 2024 : सातारा मतदारसंघात नवा ट्विस्ट; उदयनराजे तयारीत, आता नरेंद्र पाटीलही इच्छूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -