Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthचाळीशीनंतर करावे हे व्यायाम

चाळीशीनंतर करावे हे व्यायाम

Subscribe

वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या शरिरात फार बदल होतात. त्यांच्यामध्ये आधीसारखी उर्जा आणि उत्साह अधिक राहत नाही. शरिर लगेच थकते, जडं कामे जमत नाहीत अशा समस्या त्यांना उद्भवतात. यासाठी काही वेळेस मेनोपॉज ही जबाबदार असतो. मेनोपॉजपूर्वी काही महिलांमध्ये अशी काही लक्षण दिसतात त्यामध्ये मूड स्विंग ते हॉट फ्लॅशेजचा समावेश असतो. खरंतर वयाच्या चाळीशीनंतर बहुतांश महिलांमध्ये ओवरी व्यवस्थितीत पद्धतीने एस्ट्रोजन प्रोड्युस करणे बंद करते. त्यामुळेच एंग्जायटी, झोप पूर्ण न होणे, ब्रेन फॉग अशा समस्या होऊ शकतात. ऐवढेच नव्हे तर काही वेळेस स्ट्रोक आणि हृदयासंबंधित आजार, हाडं कमकुवत सुद्धा मेनोपॉजमुळे होते. अशातच गरजेचे आहे की, महिलांनी पुढील काही एक्सरसाइज वयाच्या चाळीत नक्कीच केल्या पाहिजेत.

एरोबिक्स एक्सरसाइज

- Advertisement -


वयाच्या चाळीशीनंतर हाय इंटेसिटी एक्सरसाइज करणे प्रत्येक महिलेसाठी मुश्किल नसते. अशातच वॉक, जॉगिंग, साइकलिंग किंवा स्विमिंग अशी एक्सरसाइज करू शकता. दररोज एक्सरसाइज केल्याने बॉडी स्ट्रेंथ वाढण्यास मदत होईल.

योगा आणि मेडिटेशन

- Advertisement -


मेनोपॉजमुळे ब्रेन फॉग किंवा मेमोरी पॉवरची कमतरता निर्माण होऊ शकते. अशातच तुम्ही दररोज मेडिटेशन करू शकता. योगा आणि मेडिटेशन एकूणच हेल्थसाठी फायदेशीर असते.

स्ट्रेंथिंग एक्सरसाइज


वयाच्या चाळीशीनंतर पोट आणि कंबरेच्या आसपासजवळ अधिक फॅट जमा होऊ लागते. यामुळे स्ट्रेंथिंग एक्सरसाइज फॅट कमी करण्यास मदत करेल.

स्ट्रेचिंग


शरिराला स्ट्रेच करण्याची फार गरज असते. यामुळे मसल्स रिलॅक्स होतात आणि फ्लॅक्सिबिलिटी वाढते. वर्कआउट नंतर 5 मिनिटे तरी स्ट्रेचिंग जरुर करा.

बॅलेन्स एक्टिव्हिटी


काही योगासन शरिराचा समतोल राखण्यास मदत करतात. जसे की, वृक्षासन. हे आसन दररोज केल्याने शरिराचा समतोल राखला जातो.


हेही वाचा- पावसाळ्यात योगा करु नये? पहा काय म्हणतात एक्सपर्ट्स

- Advertisment -

Manini