घरक्राइमचिंताजनक! शहरात एकाच दिवशी एका अल्पवयीन मुलासह दोन तरुणांची आत्महत्या

चिंताजनक! शहरात एकाच दिवशी एका अल्पवयीन मुलासह दोन तरुणांची आत्महत्या

Subscribe

नाशिक : शहरात एकाकीपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ तसेच नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये आत्महत्या करण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटनांमुळे पालकवर्गातील चिंता आणि जबाबदारीदेखील वाढली आहे. शहरात सोमवारी (दि.७) एका अल्पवयीन मुलासह दोन तरुणांनी वेगवेगळ्या भागात आत्महत्या केल्या. यात एका घटनेमागे प्रेमप्रकरण तर, दुसर्‍या घटनेतील व्यक्तीने आजारपणाला कंटाळून जीवन संपवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी म्हसरुळ, इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. राहुल माणिक खिल्लारे (वय १६, रा. राजीवनगर झोपडपट्टी, इंदिरानगर, मूळ रा. परभणी) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. अजय सुभाष कांबळे (वय २१, रा. वैदूवाडी, म्हसरूळ), आकाश नाना आवारे (वय २१, रा. सेंट झेविअर स्कूलजवळ, जेतवननगर, जयभवानी रोड, उपनगर) अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत.

इंदिरानगरात अल्पवयीन मुलाने संपवले जीवन

राहुल खिल्लारे (वय १६) याने सोमवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजता अज्ञात कारणातून घरात गळफास घेऊन जीवन संपविले. राहुल एका स्टेशनरी दुकानात काम करुन घरी मदत करायचा. त्याचे आई-वडील मजुरी करतात. त्याने एक महिन्यापूर्वी एक महागडा मोबाईलही खरेदी केला होता. शांत स्वभावाच्या राहुलने टोकाचे पाऊल का उचलले, याचा उलगडा इंदिरानगर पोलीस करत आहेत. घटनेनंतर त्याच्या कुटुंबासह नातलगांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला.

- Advertisement -

उपनगरमध्ये तरुणाची आत्महत्या

आकाश आवारे याने राहत्या घरात गळफास घेत जीवन संपविले. त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आजाराला कंटाळून घेतला गळफास

पायाचा दुर्धर आजार व त्याच्यावरील उपचाराला कंटाळून अजय कांबळे वैदूवाडीतील राहत्या घरात सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली आहे. त्यात पायाच्या आजारावर बरेच उपचार केले. पण पाय बरा होत नाही, त्यातून जीवनयात्रा संपवित असल्याचे चिठ्ठीत लिहिलेले आहेत. तो मजुरी करुन उदरनिर्वाह करत होता, अशी माहिती म्हसरुळचे पोलीस हवालदार केशव भोये यांनी दिली.

- Advertisement -

नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक रोड परिसरातील १९ वर्षीय विद्यार्थिनीने डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षात तीन विषयात नापास झाल्याने आत्महत्या केली. मृणाल काशिनाथ जाधव (१९, रा. एमएसईबी कार्यालयाजवळ, आदर्शनगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मानसिक ताणतणाव, एकटेपणा, प्रेमभंग, नैराश्यामुळे शहरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तरुणाईने आभासी जगात न राहता वास्तवात जगावे. किशोरवयात मुलामुलींचा स्वभाव हळवा असतो. त्यांना ताणतणाव सहन होत नाही. त्यावर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. नकारात्मक विचारांमुळे संवाद कमी होतो. मुला-मुलींनी आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक, मित्रमैत्रिणींशी मनमोकळेपणे बोलले पाहिजे. नैराश्यग्रस्त मुलासाठी कुटुंबियांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून वेळेत उपचार घ्यावेत. तसेच, कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत संवाद ठेवावा.  : डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचारतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -