Monday, April 29, 2024
घरमानिनीगर्ल्स ट्रिपसाठी बेस्ट आहेत 'ही' ठिकाणं

गर्ल्स ट्रिपसाठी बेस्ट आहेत ‘ही’ ठिकाणं

Subscribe

जेव्हा गर्ल्स ट्रिपचे प्लॅनिंग करतात तेव्हा सर्वात प्रथम सुरक्षितता हा मुद्दा उपस्थितीत होते. कारण अलीकडल्या काळापासून मुलींसोबत वाढणाऱ्या छेडछाडीच्या प्रकरणांमुळे पालक घरातून त्यांना फिरण्यासाठी पाठवत नाहीत. अशातच जर तुमची गर्ल गँग ट्रिपसाठी प्लॅन करत असाल तर पुढील काही ठिकाणं ही तुमच्यासाठी बेस्ट आहेतच. पण ती सुरक्षित ही तितकीच आहेत.

-गोवा

- Advertisement -


सुरक्षिततेच्या दृष्टीने बहुतांश महिला एकटे प्रवास करताना घाबरतात. किंबहूना त्यासाठी नकारच देतात. परंतु आपल्या सौंदर्याने नटलेल्या देशात परदेशातून ही लोक फिरण्यासाठी येत असतात. अशातच गोवा हे सुद्धा तुमच्या गर्ल्स गँगसाठी बेस्ट ठिकाणं आहे.

-सिक्कीम

- Advertisement -


केवळ मुलींनाच फिरण्यासाठी जायचे असेल तर सिक्कीम ही तुमच्याकडे पर्याय आहे. वर्षाच्या कोणत्याही महिन्यात तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

-पाँन्डेचेरी


दोन्ही बाजूला हिरवळ आणि त्यामधून जाणारा रस्ता, बंगालची खाडी, उंच-उंच मुर्त्या, सुंदर चर्च आणि फ्रेंच कल्चर असणारे हे शहर गर्ल गँगसाठी फारच प्रसिद्ध आणि सुरक्षितही आहे.

-कसौल


हिमाचल प्रदेशातील कुल्लू स्थित असलेले लहानसे गाव सोलो टॅव्हलर्ससाठी परफेक्ट लोकेशन आहे. येथील डोंगर-दऱ्या आणि नद्या या वर्षानुवर्ष आपले सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

-शिलॉंग


मेघालयाची राजधानी शिलाँग सुद्धा आपल्या सौंदर्यासह गुहा, उंचच उंच झरे, अद्भूत दृश्य, संस्कृती, कला यासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. शिलॉंग शहराचे नाव U-Shyllong नावाच्या देवतेवरुन ठेवले गेले आहे.

-जयपुर

 
राजा-महारांजा वारसा, संस्कृती, किल्ले, महाल यांच्यासाठी फार प्रसिद्ध आहे. येथील हवामहाल तर पर्यटकांचे आकर्षण बिंदू आहे.


हेही वाचा: मैत्री करताना काय काळजी घ्याल?

- Advertisment -

Manini