घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक गायब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक गायब

Subscribe

मुंबई | भारतातील बहुतांश राजकारणातील दिग्गज नेते मंडळींपासून ते बॉलिवूडच्या सुपरस्टारपर्यंत सर्वांची ट्विटरची (Twitter) ब्लू टिक हटवण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याही ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक (Blue Tick) हटविली आहे.

ट्विटरने गुरुवारपासून दिग्गज नेते, अभिनेते आणि इतर प्रतिष्ठीत व्यक्तींच्या अकाऊंट्सची मोफत ब्लू टिक हटविण्यास सुरुवात केली आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक हटविली आहे. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ब्लू टिक मात्र कायम आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील ब्लू टिक कायम आहे.

- Advertisement -

एलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासूनच ट्विटरमध्ये त्यांनी अनेक मोठे बदल केले आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे मोफत ब्लू टिक हटविणे. ज्यांना ब्लू टिक हवी आहे, त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

अशी मिळणार ब्लू टिक

- Advertisement -

ट्विटरवरील ब्लू टिक कायम ठेवायची असेल, तर त्यासाठी ब्लू टिकचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. भारतीय पैशानुसार ट्विटवर ब्लू टिकच्या सब्सक्रिप्शनसाठी महिन्याला ६५० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच मोबाईल यूझर्ससाठी ९०० रुपये प्रतिमहिना मोजावे लागणार आहे.

‘या’ दिग्गजांची ट्विटरवरील ब्लू टिक हटवण्यात आली

ट्विटरवर ज्यांची ब्लू टिक हटविण्यात आली, त्यात जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो, क्रिकेटर विराट कोहली, एम. एस. धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश होता. याशिवाय, बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन, किंग खान शाहरूख खान आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांचीही ब्लू टिक हटविली आहे. राजकीय नेत्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचे ट्विटरवरील ब्लू टिक हटवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -