घरदेश-विदेशIsrael VS Iran : इस्रायलशी संबंधित जहाज इराणच्या ताब्यात; जहाजावर 17 भारतीय...

Israel VS Iran : इस्रायलशी संबंधित जहाज इराणच्या ताब्यात; जहाजावर 17 भारतीय कर्मचारी

Subscribe

Israel Vs Iran : इस्रायलशी संबंधित एक कंटेनर जहाज इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सनी शनिवारी ताब्यात घेतले. या जहाजावर 17 भारतीय कर्मचारी देखील आहेत.

नवी दिल्ली : इस्रायलशी संबंधित एक कंटेनर जहाज इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सनी शनिवारी ताब्यात घेतले. या जहाजावर 17 भारतीय कर्मचारी देखील आहेत. इराणच्या या हालचालीमुळे येथील तणाव अजून वाढला आहे. हे जहाज आपल्या ताब्यात असल्याचे इराणने जाहीर केल्यानंतर इराणला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इस्रायलने दिला आहे.. दरम्यान, इराण आणि इस्रायलमधील वाढत तणाव पाहता भारतीयांनी या दोन देशांमध्ये जाऊ नये, अशा सूचना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारीच दिल्या होत्या. (Israel vs Iran iran seized the Israel linked ship israeli army warns consequences 17 Indian crew members on board)

भर समुद्रात घेतला जहाजाचा ताबा

भर समुद्रातच इराणच्या गार्ड्सनी या जहाजाचा ताबा घेतला. त्यापूर्वी हेलिकॉप्टरने या जहाजांवर छापे मारण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले जहाज हे बहुधा पोर्तुगीजचा झेंडा असलेले एमएससी एरीज आहे. या जहाजावर 17 भारतीय असल्याची देखील माहिती मिळाली आहे. जहाज ताब्यात घेतानाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. इस्रायल लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितले की, इराण आहे ती परिस्थिती अजून बिघडवत आहे. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांमध्ये 17 भारतीयांचा समावेश

पोर्तुगीजचा झेंडा असलेल्या या एमएससी एरीज मालवाहू जहाजावरील एकूण 25 कर्मचाऱ्यांपैकी 17 भारतीय आहेत. तर अन्य लोकांमध्ये चार फिलिपिन्स, दोन पाकिस्तानी, एक रशियन आदींचा समावेश आहे. आयआरएनए या इराणी सरकारी एजन्सीने जहाज ताब्यात घेतल्याचे वृत्त खरे असल्याचे म्हटले आहे. त्यापूर्वी एका खासगी वृत्तसंस्थेला हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जहाजावर छापेमारी करतानाचा व्हिडीओ देखील मिळाला होता. (Israel vs Iran iran seized the Israel linked ship israeli army warns consequences 17 Indian crew members on board)

काही दिवसांपूर्वी सीरियामधील इराणच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यासाठी इराणने इस्रायलला जबाबदार ठरवले आहे. यानंतर या दोन्ही देशांमधील तणाव अजूनच वाढला. लवकरच इस्राएलवर हल्ला करण्यात येईल, असे वृत्त आल्याने भारत सरकारने आपल्या नागरिकांना या दोन्ही देशात जाण्यास मनाई केली आहे. तसेच या दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपली काळजी घेण्याचे तसेच आपल्या हालचाली कमीतकमी ठेवण्याचे आवाहन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. सध्या या भागात जी परिस्थिती आहे, ती पाहता नागरिकांनी या दोन्ही देशात जाणे टाळावे. तसेच जे भारतीय सध्या या दोन देशात आहेत, त्यांनी तातडीने तेथील भारतीय दूतावासासोबत संपर्क करावा आणि आपली नोंदणी करून घ्यावी, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

दोन्ही देशांमध्ये किती भारतीय? (How many Indians in both countries?)

आजघडीला इस्राएलमध्ये 18,000 भारतीय नागरिक आहेत. यातील बहुतेक भारतीय आयटी क्षेत्रात आहेत किंवा अन्य क्षेत्रात कार्यरत आहेत. 64 भारतीय कामगारांची पहिली बॅच 2 एप्रिल रोजी इस्रायलला रवाना झाली होती. तर आणखी जवळपास 6,000 भारतीयांना पुढच्या महिन्यात पाठवले जाणार होते. मात्र, आता ते शक्य होईल असे वाटत नाही. तर इराणमध्ये जवळपास 5 हजार भारतीय आहेत. यातील बहुतेकजण हे छोटे व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रात आहेत. (Israel vs Iran iran seized the Israel linked ship israeli army warns consequences 17 Indian crew members on board)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -