घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : केरळ-तामिळनाडूत इंडिया तर, कर्नाटकात एनडीए; सी-व्होटर सर्व्हे...

Lok Sabha Election 2024 : केरळ-तामिळनाडूत इंडिया तर, कर्नाटकात एनडीए; सी-व्होटर सर्व्हे अहवाल

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रियेला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदा देशात एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढत असणार आहे. मात्र काही मतदारसंघात अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही आहेत. अशात देशभरातील विविध राज्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोणाला मिळू शकते, याबाबत सर्वेक्षण केले जात आहे.

केरळ : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रियेला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदा देशात एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढत असणार आहे. मात्र काही मतदारसंघात अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही आहेत. अशात देशभरातील विविध राज्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोणाला मिळू शकते, याबाबत सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेनुसार देशातील काही राज्यांमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीला सर्वाधिक मतदान आहे तर, एनडीएला कमी मतदान आहे. नुकताच केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातील सीव्होटर सर्वेक्षण अहवाल समोर आला. त्यानुसार, केरळ आणि तामिळनाडूमध्ये इंडियाला सर्वाधित मत आहेत तर, कर्नाटकात एनडीएला सर्वाधिक मत आहेत. (Lok Sabha Election 2024 India Alliance in Kerala Tamil Nadu and NDA in Karnataka C Voter Survey Report)

एबीपीच्या (सोमवार, 15 एप्रिल रोजीच्या) सी व्होटर सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये दक्षिण भारतात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांची इंडिया आघाडी केरळ आणि तामिळनाडूमध्ये क्लीन स्वीप करू शकते. तसेच, संपूर्ण दक्षिण भारतातील केवळ कर्नाटकात भाजपला चांगली मत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मतदार कोणाला विजयी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदी विरुद्ध जनता अशी ही निवडणूक ; प्रकाश आंबेडकरांचा काय आहे दावा?

दक्षिण भारतातील पाचपैकी तीन राज्यांतील मतदारांची मतं सांगणारा एबीपीचा सी व्होटर अहवाल समोर आला आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार, केरळमध्ये लोकसभेच्या एकूण 20 जागा आहेत. सर्वेक्षणानुसार, काँग्रेस+ (इंडिया आघाडी) या सर्व जागा जिंकू शकतात, तर भाजप आणि इतरांना त्यांचे खाते उघडता येणार नाही अशी शक्यता आहे.

- Advertisement -

तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत. सी व्होटर सर्वेनुसार तामिळनाडूतही इंडिया आघाडी एनडीएला क्लीन स्वीप देऊ शकते. पण हा सर्वे खरा ठरल्यास भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. केरळ आणि तामिळनाडू व्यतिरिक्त, सध्या दक्षिणेतील हे एकमेव राज्य आहे, जिथे भाजपला चांगली बातमी मिळू शकते. सर्वेक्षणानुसार, भाजपा + (एनडीए) 23 जागा जिंकू शकतो, तर काँग्रेस + (इंडिया) फक्त पाच जागा जिंकू शकतात. त्यामुळे यंदा मतदार कोणाला विजयी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – LOK SABHA 2024 : जाहीरनाम्यात जुनीच बाटली आणि जुन्याच दारूचा बार उडवला, ठाकरे गटाचे भाजपावर टीकास्त्र

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -