घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : तरुणांच्या देशात वृद्धांची संख्या महाराष्ट्रामध्ये जास्त, 85...

Lok Sabha Election 2024 : तरुणांच्या देशात वृद्धांची संख्या महाराष्ट्रामध्ये जास्त, 85 वर्षांवरील सर्वाधिक मतदार

Subscribe

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सर्वांनी मतदान करावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जात आहे.

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सर्वांनी मतदान करावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जात आहे. अशात ज्येष्ठ नागरिकांसाठी (85 वर्षां पुढील) निवडणूक आयोगाने यंदा घरबसल्या मतदानाची सोय केली आहे. त्यासाठी निवडणूक कर्मचारी सध्या वयोवृद्ध मतदारांची माहिती गोळा करण्यासाठी घरोघरी जात आहे. या माहितीनुसार, महाराष्ट्रात 85 वर्षांवरील मतदार सर्वाधिक आहेत. (Lok Sabha Election 2024 Maharashtra has the highest number of voters above 85 years in India)

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात वयोवृद्ध मतदारांची संख्या 13 लाखांच्या घरात आहे. तसेच, महाराष्ट्रातील या 13 लाख वयोवृद्धांच्या मतदानाचे ठिकाण नक्की करण्यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी मतदार याद्यांवरील पत्त्यानुसार नागरिकांची भेट घेत आहेत. ब्लॉक लेव्हलचे अधिकारी, कर्मचारी मतदार याद्यांतील पत्त्यांवर वयोवृद्ध मतदारांपर्यंत पोहचत आहेत. या मतदारांची भेट घेऊन त्यांनी घरूनच मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती देत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : दिल्लीतील तीनही जागांवर काँग्रेसचे उमेदवार जाहीर, अशी असेल लढत

यंदाच्या लोकसभेत जे घरून मतदान करणार आहेत, त्यांच्याकडून 12-ड हा वेगळा अर्ज भरून घेतला जाणार आहे. तसेच, वयोवृद्ध मतदारांनी भरलेले 12-डचे अर्ज जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केले जातील. या कार्यालयांकडून वृद्धांच्या मतदानासाठीची कार्यवाही केली जाणार आहे.

- Advertisement -

देशभरात वयोवृद्ध मतदारांची संख्या ही 81 लाख इतकी आहे. यामध्ये महाराष्ट्रात वयोवृद्ध मतदारांची संख्या 13 लाखांच्या घरात आहे, त्यानंतर सर्वात मोठं राज्य समजलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात 10.4 लाख वयोवृद्ध मतदार आहेत. बिहारमध्ये 6.6 लाख मतदार आहेत. मात्र, तमिळनाडू आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये वयोवृद्ध मतदारांची संख्या सर्वात कमी आहे. विशेष म्हणजे देशभरातील 81 लाख वयोवृद्ध मतदारांमध्ये महिला मतदार सर्वाधिक म्हणजेच 58 टक्के आहेत. त्यानुसार, 47.3 लाख महिला मतदार आहेत तर, वयोवृद्ध मतदार हे 33.8 लाख आहेत. शिवाय महाराष्ट्रातील 13 वयोवृद्ध मतदारांपैकी 7.3 लाख महिला तर, 5.7 लाख पुरूष मतदार आहेत.

निवडणूक आयोगाची वयोवृद्धांसाठीची सुविधा

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच घरगुती मतदान सुरू केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी मतदान करणे सोपे करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आता, 85 वर्षांवरील आणि 40 टक्के बेंचमार्क अपंगत्व असलेले PwD मतदार घरबसल्या मतदान करू शकतात. या सुविधेचा लाभ घेण्याची प्रक्रिया सोपी आहे. पात्र मतदारांनी निवडणूक अधिसूचनेच्या पाच दिवसांच्या आत फॉर्म 12D भरून रिटर्निंग ऑफिसरकडे जमा करणे आवश्यक आहे. PwD मतदारांनी त्यांच्या अर्जासोबत बेसलाइन अपंगत्व प्रमाणपत्र समाविष्ट करणे आवश्यक आहे. तसेच, मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एक समर्पित टीम त्यांची मते गोळा करण्यासाठी मतदारांच्या निवासस्थानी जाते. सुरळीत मतदानाचा अनुभव सुनिश्चित करून मतदारांना भेटीबद्दल आगाऊ माहिती दिली जाते. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेसाठी नोंदवली जाते.


हेही वाचा – BJP vs Thackeray group : नारदमुनींची कथा सांगत ठाकरे गट म्हणतो, शेवटी संस्कार महत्त्वाचे…

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -