Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthवाढत्या वयात घ्या खाण्यापिण्याची काळजी

वाढत्या वयात घ्या खाण्यापिण्याची काळजी

Subscribe

वाढत्या वयासह आजार सुद्धा वाढू शकतात. खासकरून वयाच्या 50 वर्षानंतर मधुमेह, थायरॉइड, हृदयासंबंधित आजार अधिक वाढले जातात. तर काही लोकांच्या या वयात येईपर्यंत सर्जरी सुद्धा झालेल्या असतात. अशातच एखादा आजार झाला असेल तर वजन सुद्धा कमी होऊ लागते. या व्यतिरिक्त भुक सुद्धा कमी होते. याचे कारण म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट न वाढणे. जर एखाद्या व्यक्तीचे वजन 70 किलो आहे तर त्याला दररोज 2500 कॅलरीजची गरज असते. त्यामुळे वाढत्या वयात नक्की कशी काळजी घेतली पाहिजे हे पाहूयात. (Health care tips)

पाचनक्रिया उत्तम ठेवा
वाढत्या वयात पचनशक्ती कमी होते. चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. शरिराचे सर्व अंग, रक्तवाहिन्या सुद्धा कमजोर होतात. अशातच शरिराला उर्जा मिळावी म्हणून खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. अशातच तुम्ही हिरव्या पालेभाज्या, मासे खाऊ शकता.

- Advertisement -

हाइड्रेट रहावे
वाढत्या वयासह शरिरात पाण्याची कमतरता कमी होऊ लागते. जर तुम्ही 60 वर्षापेक्षा अधिक असाल तर दररोज तीन ते साडे तीन लीटर पाणी प्या. शरिरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डिहाइड्रेटसह शरिराला पुरेसा रक्तपुरवठा सुद्धा होत नाही.

फुफ्फुस ठेवा हेल्दी
फुफ्फुसांचे कार्य सुरळीत राहण्यासाठी सर्वात प्रथम गरजेचे आहे की, तुमच्या शरिरात पुरेसे पाणी असावे. दुसरे म्हणजे, कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता. औषधांऐवजी नैसर्गिक उपायांची मदत घ्या.

- Advertisement -

सूज येण्याची समस्या
दीर्घकाळापर्यंत सूज राहणे ही वाढत्या वयाचे सर्वाधिक मोठे लक्षण आहे. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे रुमेटाइड अर्थराइटिस सारखे आजार होऊ लागतात. रुमेटाइड अर्थराइटिस, ऑस्टिओ आर्थराइटिस सारख्या समस्या वयस्कर व्यक्तींमध्ये सामान्य आहे. व्हिटॅमिन डी हाडांना मजबूत करते.

स्नायूंच्या बळकट राहणे महत्त्वाचे
स्नायू बळकट राहण्यासाठी हाय प्रोटीन असणारे खाद्यपदार्थ खा. शाहाकारी जेवण जेवले पाहिजे. शरिराला दररोज 60 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. अशातच तुम्ही अंड खाऊ शकता.

व्यायाम ही गरजेचा
दररोज 30 मिनिटे तरी वॉक करा. आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस तरी वॉकला जा. त्याचसोबत तेलकट पदार्थांपासून दूर रहा.


हेही वाचा- आजीच्या बटव्यातील हे आहेत सात आजारांवरील सात उपचार

- Advertisment -

Manini