घरताज्या घडामोडीNCP Crisis : वय 82 असो की... सर्वेसर्वा मीच, शरद पवारांनी दिलं...

NCP Crisis : वय 82 असो की… सर्वेसर्वा मीच, शरद पवारांनी दिलं दादांना उत्तर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच एस. आर. कोहली यांनादेखील निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला धक्का देणारा हा निर्णय आहे. दरम्यान पक्षाला चांगल्या स्थितीत नेण्याची आमची मानसिकता आहे. या बैठकीतून आमच्या आशा पूर्णपणे जागा झाल्या आहेत. तसेच आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

शरद पवारांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, पक्षाला ठेच पोहोचवण्याचं काम काही सहकाऱ्यांनी केलं. पक्षाला चांगल्या स्थितीत नेण्याची आमची मानसिकता आहे. त्यामुळे या बैठकीतून आमच्या आशा पूर्णपणे जागा झाल्या आहेत. तसेच आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा मीच राष्ट्रीय अध्यक्ष आहे. कुणी कुणाची नियुक्ती केली त्यात काही सत्य नाही. नवा अध्यक्ष नेमल्याची कोणतीही माहिती नाही. आजची कार्यकारणीची झालेली बैठक ही पूर्णपणे संविधानिक आहे. कुणीही यावर भाष्य करत असेल तर त्याला काहीच महत्त्व नाही.

- Advertisement -

अजित पवारांनी वयावरून शरद पवारांना टार्गेट केलं होतं. त्यावर पवारांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. वय हा मुद्दाच नाहीये. वय 82 असो की 92 त्याचा फरक पडत नाही. वयाच्या 92 वर्षांपर्यत लढू शकतो. कुणाला काय व्हायचं आहे, याच्याशी काही देणं-घेणं नाही. तसेच वेळ आल्यावर कुणाकडे किती संख्याबळ आहे हे कळेल, असं पवार म्हणाले.

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. आम्हाला जे काही सांगायचं असेल त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगासमोर जाऊ. परंतु आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. मात्र, तशी वेळेच येणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.

भाजपला या सर्वाची किंमत चुकवावी लागणार असून 2024 ला राज्यातील जनता महाविकास आघाडीला सत्ता देतील, असंही पवार म्हणाले.


हेही वाचा : Congress : मुलीसाठी नेत्यांना बाजूला केलं, काँग्रेस नेत्याचा मोठा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -