घरमहाराष्ट्रGunaratna Sadavarte : सहकार खात्याचा गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; रोहित पवारांनी अधिवेशनात...

Gunaratna Sadavarte : सहकार खात्याचा गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; रोहित पवारांनी अधिवेशनात केली होती कोंडी

Subscribe

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या संचालकपदावर गुणरत्न सदावर्ते यांचे जवळचे नातेवाईक सौरभ पाटील हे कार्यरत आहेत. मात्र त्यांचे वय कमी असल्यामुळे त्याच्यासाठी निकष बदलले गेले आहेत का? सरकार यात लक्ष घालणार का? चुकीच्या निर्णय घेणाऱ्या या संचालक मंडळाला बरखास्त करणार का? असा सवाल रोहित पवार यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना हिवाळी अधिवेशात विचारला होता. यानंतर आता सौरभ पाटील यांची नियुक्ती कोणत्याही निकषात बसत नसल्याचे सांगत त्यांना संचालकपदावरून हटवण्याचे आदेश आता सहकार आयुक्तांकडून एसटी बँकेला देण्यात आले आहेत. त्यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांना राज्याच्या सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. (A big blow to Gunaratna Sadavart of Cooperative Department Rohit Pawar created a dilemma in the session)

हेही वाचा – NCP : अजित पवार-अमोल कोल्हे वादात शरद पवार गटाच्या नेत्याची उडी; दादांनाच दिले ‘हे’ आव्हान

- Advertisement -

रोहित पवार यांनी रिझर्व बँकेच्या अटी शिथिल करून सौरभ पाटील या 22 वर्षीय तरूणाला बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बसविण्यात आले आहे. सहकारी बँकेत 62 हजार सभासद आहेत, त्याच्या पाचशे शाखा आहेत व 23 हजार कोटींपेक्षा अधिक ठेवी तिथे आहेत. कर्मचाऱ्यांना या बँकेच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा असते की, आरोग्या संदर्भातील कोणता प्रश्न उद्भवला, घर बांधण्यासाठी एखादे लोन घ्यायचे असेल तर आपल्याला मदत मिळावी. या सर्व गरीब कर्मचाऱ्यांना कुठल्याही नॅश्नलाईज बँकेतून कर्ज मिळत नाही, ही बँक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निवडण्यासाठी रिजर्व बँकेने काही नियम टाकून दिले आहेत का? असा सवाल केला होता.

तसेच कुठलाही संचालक 35 वर्षांच्या खाली व 70 वर्षांच्या पुढे नको, असे हे नियम आहेत. या बँकेत कंत्राटी पद्धतीने एक अनुभव नसलेल्या 22 वर्षांच्या तरुणाची संचालक पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर या बँकेने एक जाहिरात काढली व त्यात रिजर्व बँकेचे नियम शिथिल केले. 500 ते 600 कोटी रुपयांचे डिपॉझिट काढून बँकेला अडचणीत आणले आहे. सरकार यात लक्ष घालणार का? चुकीच्या निर्णय घेणाऱ्या या संचालक मंडळाला बरखास्त करणार का? चुकीच्या निर्णय घेणाऱ्या या संचालक मंडळाला बरखास्त करणार का? असा सवाल रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना विचारला होता. तर चौकशी अहवाल एक महिन्यात मागवून घ्यावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेच्या यामिनी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, भाजपच्या हरिभाऊ बागडे आदींनी उपप्रश्न विचारले होते.

- Advertisement -

हेही वाचा – BJP : काँग्रेसचे “हैं तैयार हम” अभियान नेमकं कशासाठी? भाजपाने विचारले पाच प्रश्न

सौरभ पाटील यांना आठवडाभरात संचालकपदावरून काढून टाकण्याचे आदेश

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा विजय झाला होता. त्यानंतर सदावर्ते यांचा नातेवाईक असलेल्या सौरभ पाटील यांची बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती झाली. मात्र पाटील यांचं वय 25 वर्षांपेक्षाही कमी आहे. एकीकडे संचालकपदासाठी आरबीआयकडून 35 वर्ष वयाची आणि किमान आठ वर्ष अनुभवाची अट असताना नवख्या सौरभ पाटील यांची झालेली नियुक्ती सुरुवातीपासूनच वादात सापडली होती. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या इतर आमदारांनी हा मुद्दा आक्रमकपणे सभागृहात उपस्थित केला होता. त्यानंतर आता सहकार खात्याकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे दिसत आहे. सहकार आयुक्तांनी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेला पत्र लिहून सौरभ पाटील यांना आठवडाभरात संचालकपदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले असून याच कालावधीत नव्या संचालकांची नेमणूक करा, असंही सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -