घरठाणेthaneThane : ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा E-mail; पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात

Thane : ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा E-mail; पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात

Subscribe

यापूर्वी आरबीआय कार्यालय (RBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) या यांच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल आला होता.

ठाणे : दहशतवाद्याच्या निशाण्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. ठाण्यातील ज्यू धार्मियांचे प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पोलिसांना आज दुपारी आला. ठाणे पोलिसांना अज्ञात ई-मेलद्वारे धमकीचा आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी ई-मेलची दखल घेत प्रार्थनास्थळी बॉम्बशोध पथक दाखल झाले असून सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या परिसरातील सर्व रस्ते ठाणे पोलिसांनी बंद ठेवले आहे. या संपूर्ण परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

ठाण्यातील सिनेगॉग चौकात ज्यू धार्मियांचे प्रार्थनास्थळ असून या परिसरातील रस्ते हे वर्दळीचे आहेत. पोलिसांना आलेला धमकीचा ई-मेल हा Funing असे धमकी देणाऱ्या ग्रुपचे नाव आहे. पोलिसांना ई-मेल आल्यानंतर त्यांनी तातडीने शोध मोहीम राबवली. पण पोलिसांना अद्यापही काही संशयास्पद आढळून आले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha 2024: जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत बिघाडी? राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस नेत्याचा पलटवार

RBIच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी 

यापूर्वी आरबीआय कार्यालय (RBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) या यांच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल आला होता. या ई-मेलमध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. हा धमकीचा ई-मेल खिलाफत इंडियाकडून आल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – NCP : अजित पवार-अमोल कोल्हे वादात शरद पवार गटाच्या नेत्याची उडी; दादांनाच दिले ‘हे’ आव्हान

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर हल्ल्याची धमकी

या वर्षी महिन्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर सुमारास एक धमकीचा फोन आला होता. यावेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव इरफान अहमद शेख असून तो इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे सांगितले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -