Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenजेवण बनवताना 'या' चुका टाळा

जेवण बनवताना ‘या’ चुका टाळा

Subscribe

जेवण बनवणे ही एक कला आहे. ज्यामध्ये मसाले आणि काही ट्रिक्स वापरल्या तर पदार्थ स्वादिष्ट होतात. काही लोकांसाठी जेवण बनवणे अगदी सोपे असते तर काहींसाठी नाही. तर आपण जे घरी जेवण बनवतो त्याची टेस्ट ही रेस्टॉरंट पेक्षा फार वेगळी असते. अशातच प्रत्येकालाच उत्तम जेवण बनवता येते असे नाही. पण तुम्ही काही टीप्स फॉलो केलात तर नक्कीच तुमचे जेवण स्वादिष्ट होऊ शकते.

पॅन किंवा कढई व्यवस्थितीत गरम करा
जी लोक आधीच पॅन किंवा कढई गरम करत नाही त्यांचे पदार्थ भांड्यांना चिकटतात. अशातच पदार्थ करणे मुश्लिक होते. एखादे तेल किंवा भाज्या टाकताना पॅन किंवा कढई कमीत कमी पाच मिनिटे तरी गरम करा. यामुळे तुमचे जेवण पटकन होईलच पण ते बनवणे ही सोप्पे होईल.

- Advertisement -

तेल गरम होण्याची वाट न पाहणे
जी लोक तेल गरम करण्याची वाट पाहत नाही त्यांचे पदार्थ तवा किंवा भांड्याला चिकटतात. कढईत तेल टाका आणि ते गरम झाल्यानंतर तुमचे पदार्थ त्यात टाका.

- Advertisement -

सर्वच गोष्टी एकत्रित टाकू नका
खासकरुन ही चुक तेव्हा होते जेव्हा जेवण बनवताना पॅनमध्ये एकत्रित सर्व सामग्री टाकली जाते. यामुळे पदार्थ बाहेरुन जळतो आणि आतमधून कच्चा राहतो. पदार्थ स्वादिष्ट होण्यासाठी तुम्ही पुरेशी जागा पॅन किंवा कढईत ठेवा.

कुकिंस प्रोसेस दरम्यान लगेच लसूण टाकणे
आलं किंवा कापलेले लसूण टाकणे हे सामान्य बाब आहे. असे करणे काही वेळेस योग्य सुद्धा आहे. परंतु जेव्हा तुम्ही अधिक भाज्या शिजवत असाल तर त्या जळतता किंवा कडू होतात. लसूण अन्य सामग्रीसोबत मिक्स करा आणि कमी वेळासाठी शिजवा. जेणेकरुन तुम्ही न जळता त्याच्या टेस्टची मजा वेगळीच येते.

मीठाचा योग्य प्रमाणात वापर
जर तुम्ही पदार्थात जास्त मीठ टाकत असाल तर ते अधिक खारट होऊ शकतात. मीठ टाकताना थोडा विचार करा आणि टाका. एखादा पदार्थ तयार होताना नमक कमी असेल तर तुम्ही त्यात नंतर टाकू शकता. पण मीठ जास्त झाल्यास त्यावर तुम्ही काही करु शकत नाही.

गरम तेलात थंड पदार्थ टाकू नका
बहुतांश लोक घरात पनीर किंवा फ्रोजन फूड आयटम फ्रिजमध्ये ठेवतात. ते फ्राय करण्यासाठी फ्रिजमधून काढून थेट गरम तेलात टाकतात. यामुळे तेल तुमच्या अंगावर उडू शकते. अशातच त्यामधील थंडावा निघून गेल्यानंतरच ते फ्राय करा.

ओवरकुकिंग करणे
जेव्हा लोक भाज्यांना गरजेपेक्षा अधिक शिजवतात तेव्हा त्या नरम आणि मऊओ होण्याऐवजी त्यामधील पौष्टिक घटक निघून जातात. यामुळे पदार्थाची टेस्ट ही बिघडते. त्यामुळे ओवरकुकिंग करण्यापासून दूर रहा.


हेही वाचा- पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासह बेसिक कुकिंग टीप्स

- Advertisment -

Manini