अनेक महिलांना दररोज काहीना काहीतरी नवीन पदार्थ बनवायला आवडतात. आज आम्ही तुम्हाला पनीर वडा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.
साहित्य :
- पनीर- 200 ग्रॅम
- दही- 4 कप
- बटाटे- 2 उकडलेले
- हिरव्या मिरच्या – 1-2 बारीक कापलेल्या
- आलं
- हिरवी चटणी – 1 कप
- जिरे – दोन मोठे चमचे भाजलेले
- लाल मिरची पावडर – लहान चमचा
- मिरपूड – 1/2 चमचा
- तेल – तळण्यासाठी
- काळे मीठ – 2 चमचे
- मीठ – चवीनुसार
कृती :
- सर्वप्रथम पनीर आणि बटाटे कुस्करुन घ्या आणि चांगल्या प्रकारे एकत्र करा.
- या मिश्रणामध्ये आले, हिरवी मिरची आणि मीठ टाकून चांगल्या प्रकारे मळून घ्या.
- आता याचे गोल-गोल वडे तयार करा.
- हे वडे तळण्यासाठी कढईत टाका.
- सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- हे सर्व्ह करण्यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे तीन-चार वडे प्लेटमध्ये घ्या.
- त्यावरून दही, काळे मीठ, भाजलेले जिरे, मिरपूड, लाल मिरची पावडर, गोड चटणी, हिरवी चटणी टाका.
- Advertisement -
हेही वाचा :
Moong Daal Samosa : मूग डाळीचा पौष्टिक समोसा नक्की ट्राय करा
- Advertisement -
- Advertisement -