घरमहाराष्ट्रसाखरेच्या दरानं गाठला उच्चांक ; गेल्या सहा वर्षांतील सर्वोच्च भाव

साखरेच्या दरानं गाठला उच्चांक ; गेल्या सहा वर्षांतील सर्वोच्च भाव

Subscribe

साखरेच्या दरात तीन टक्क्यांची वाढ झालीय. सध्या साखरेचे दर हे 37 हजार 760 रुपये प्रति टनांपर्यंत वाढले आहेत. ऑक्टोबर 2017 नंतरचे हे सर्वोच्च दर आहेत. साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर व्यापारी आणि उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे.

यंदा उसाचं उत्पादन घटल्यानं साखरेचं उत्पादन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता देशातील साखरेचा सध्याचा कोटा आणि भविष्यात तयार होणारी साखर याचा मेळ घातल्यास साखर कमी पडण्याची शक्यता आहे. यामुळे साखरेचे भाव वाढणार असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात होतं. आता साखरेच्या दरात तीन टक्क्यांची वाढ झालीय. सध्या साखरेचे दर हे 37 हजार 760 रुपये प्रति टनांपर्यंत वाढले आहेत. ऑक्टोबर 2017 नंतरचे हे सर्वोच्च दर आहेत. साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर व्यापारी आणि उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकचा नंबर लागतो. या दोन्ही राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, त्याचा परिणा ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि उत्पादकांचे म्हणणं आहे. (sugar went up by four repees per kg in the retail market )

देशात साखरेचा कोटा दर महिन्याला वाटप होतो. त्यानुसार जाड आणि बारिक साखरेचे दर निश्चित केले जातात. विशेष म्हणजे शेअर बाजाराप्रमाणे साखरेच्या दरात चढउतार सुरू असते. जूनमध्ये साखर किरकोळ बाजारात 42 रुपये किलो होती. जुलै आणि ऑगस्टमध्ये 44 रुपये किलो तर आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 48 रुपये किलोपर्यंत दरवाढ झाली आहे. APMC त घाऊक बाजारात बारीक साखरेचं दर हे 33 ते 34 रुपये होते. ते आता 37 ते 38 रुपये झाले आहेत. तर जाड साखरेचे दर 34 रुपये किलो होते. ते 38 रुपये 50 पैसे ते 39 रुपये किलोंपर्यंत पोहचले. ही दरवाढ दिड महिन्यांत झाली असून किलोमागे साखर चार रुपयांनी महाग झाल्याची माहिती बॉम्बे शुगर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली. ही दरवाढ सणासुदीत आणखी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: सरकार अडचणीत आले की संघ असा धावून येतो…, आरक्षणावरून काँग्रेसचे शरसंधान )

साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येणार?

साखरेचे दर असेच वाढत राहिले तर केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णयही घेऊ शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे. निर्यातबंदी केल्यास देशांतर्गत बाजारात साखरेच्या किंमती कमी करता येतील. साखरेचा साठा कमी होत असल्यानं येत्या काही महिन्यांत साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -