घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : आमचे त्रिशूळ पूर्ण झाले; फडणवीसांनी केले अजितदादांचे कौतुक

Devendra Fadnavis : आमचे त्रिशूळ पूर्ण झाले; फडणवीसांनी केले अजितदादांचे कौतुक

Subscribe

 

गडचिरोलीः अजित पवार सोबत आल्याने आमचे त्रिशूळ पूर्ण झाले आहे. हे आमचे विकासाचे त्रिशूळ आहे. आमचे त्रिशूळ राज्यातील गरीबी दूर करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे व्यक्त केला.

- Advertisement -

गडचिरोली येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. अजित पवार हे आमचे जूने मित्र आणि सहकारी आहेत. ते सोबत आल्याने आमचे त्रिशूळ पूर्ण झाले आहे. आमचे त्रिशूळ नक्कीच महाराष्ट्राचा विकास करेल, गडचिरोलीचा विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचाःमाझा अंदाज चुकला म्हणून माफी मागायला आलो, पवारांचा भुजबळांना नाव न घेता टोला

- Advertisement -

या कार्यक्रमात लाभार्थ्यांना रिक्षा आणि ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले, गडचिरोलीतून कच्चा माल बाहेर जातोय हे चित्र बदलून येथे कारखानदार यायला हवेत. त्यासाठी नक्कीच सरकार सहकार्य करेल. छत्तीसगड, ओडिशा व झारखंड येथे पोलाद आणि स्टीलची इंडस्ट्री उभी राहिली आहे. अशीच इंडस्ट्री गडचिरोलीत उभी रहावी असे आमचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण झाल्यास गडचिरोलीत रोजगार उपलब्ध होईल. येथे मायनिंग ब्लॉक आहेत. उद्योजक येथे येण्यास इच्छूक आहेत.

गडचिरोलीत होणार मेडिकल कॉलेज

गडचिरोलीत मेडिकल कॉलेज आम्ही उभारणार आहोत. अजित पवार यांनी येथे विमानतळ करण्याची मागणी केली आहे. ही मागणी नक्कीच पूर्ण केली जाईल. लवकरच आम्ही विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना येथे सर्व्हेक्षणासाठी पाठवणार आहोत. गडचिरोलीत नेटवर्कची समस्या असल्याचे तेथील विद्यार्थ्यांनी सांगितले. नेटवर्कची समस्या दूर करण्यासाठी 544 मोबाइल टॉवर आम्ही येथे उभारु, जेणेकरुन नेटवर्कची समस्या येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

अजित पवार हे सध्याच्या राजकारणातील ‘संत’

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्याच्या राजकारणातील ‘संत’, तर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे ‘महात्मे’ बनले आहेत याविषयी सामान्य जनांच्या मनात आता कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची हमी पंतप्रधान मोदी यांनी दिली व त्या हमीनुसार मुश्रीफ वगैरे महात्मे तुरुंगातच जाणार होते, पण आता न्यायालयाने त्यांना जामिनावर बाहेर ठेवले व इतरांच्या फाईलींना ‘चाप’ लावला. हे फक्त आपल्या देशातच घडू शकते, असे शरसंधान ठाकरे गटाने केले आहे. भ्रष्टाचार करा व भाजपात सामील व्हा, कायदा तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही. जणू हीच ‘गॅरंटी’ मोदी व त्यांचा पक्ष देत आहे. तुरुंगांच्या भिंतींचे भय आता भ्रष्टाचाऱ्यांना उरलेले नाही. भाजपाच्या मोदी पायरीवर लीन व्हायचे व तुरुंगांच्या भिंतींवर बसून उड्डाण करायचे. ज्ञानेश्वरांच्या पवित्र भिंतीस मागे टाकणाऱ्या या उडणाऱ्या भिंती आहेत. दुसरा एखादा कोणी या प्रकरणात असता तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात तो ‘चक्की पिसिंग’ला गेला असता, पण आता अजित पवार, मुश्रीफ, भुजबळ, वळसे हे ‘चक्की पिसिंग’चे महात्मे शुद्ध होऊन ‘पवित्र’ भिंतीवर बसले व उडत राजभवनावर गेले. तेथे ‘रेडे’ कापून मंत्र म्हणणाऱ्यांच्या पंगतीला बसले. म्हणजे रेड्यांचे महत्त्व येथेदेखील आहे. लोकांची मतीच गुंग झाली आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -