Wednesday, October 4, 2023
घर मानिनी Kitchen Paneer Cheese Sandwich : 10-15 मिनिटांमध्ये तयार करा पनीर-चीज सँडविच

Paneer Cheese Sandwich : 10-15 मिनिटांमध्ये तयार करा पनीर-चीज सँडविच

Subscribe

अनेकदा आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये सँडविच खाणं पसंत करतो. सँडविचचा नाश्ता पचायला हलका आणि पौष्टिक मानला जातो. पण कधी कधी तोच भाज्याचा सँडविच खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही पनीर-चीज सँडविच नक्कीच ट्राय करु शकता.

साहित्य :

 • 1 वाटी पनीर
 • 1 कांदा चिरलेला
 • 1 टोमॅटो चिरलेला
 • 1/2 वाटी किसलेलं चीज
 • 1 चमचा आलं-लसूण-मिरची (वाटलेली)
 • 1/4 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 7-8 ब्रेड स्लाईस
 • 1/4 वाटी टोमाटो सॉस
 • मीठ चवीनुसार
 • बटर

कृती :

Grilled Paneer Pineapple Sandwich Recipe by Archana's Kitchen

- Advertisement -

 

 • पनीर कुस्करून घेऊन त्यात किसलेले चीज, आलं-लसूण-मिरची पेस्ट , कोथिंबीर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो मिक्स करा.
 • ब्रेडच्या स्लाईसला एका बाजूने टोमाटो सॉस लावावा .
 • बाकी ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण पसरून वर उरलेले स्लाईस लावून त्याचे सॅन्डविच तयार करावेत .
 • बाहेरच्या बाजूने बटर लावून नॉनस्टीक सॅन्डविचमेकरमध्ये भाजावेत.
 • गरमा गरम सॅन्डविच सॉससोबत सर्व्ह करा.

 


- Advertisement -

हेही वाचा :

Paneer Dahi Vada : सोप्या पद्धतीने बनवा पनीर दही वडा

- Advertisment -

Manini