घरमहाराष्ट्रLok Sabha : वंचितच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांनी...

Lok Sabha : वंचितच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांनी वडेट्टीवारांवर साधला निशाणा

Subscribe

विधानसभा विरोधी पक्षनेते प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होतं ते त्यांना मिळालं नाही, त्यामुळे चर्चा न करता त्यांनी लग्न मोडलं, असा टोला लगावला होता. यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांना विचारले असता त्यांनी इशारा दिला की, वंचितच्या नादी लागू नका. कारण आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे चा नारा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र काँग्रेसचा प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडं, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना विधानसभा विरोधी पक्षनेते प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होतं ते त्यांना मिळालं नाही, त्यामुळे चर्चा न करता त्यांनी लग्न मोडलं, असा टोला लगावला होता. यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांना विचारले असता त्यांनी इशारा दिला की, वंचितच्या नादी लागू नका. कारण आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. (Lok Sabha Election 2024 Dont be fooled by the underprivileged we are experts in tearing clothes Prakash Ambedkar targeted Vijay Wadettivar)

आज माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांना विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात जागांची तडजोड होते. आपण बघितलं तर महाविकास आघाडीचं कालपर्यंत जागावाटपाचं वाटप झालं नव्हतं. त्यामुळे अशा माणसाने हुंड्याची चर्चा करू नये, असं मला वाटतं. जर मी काढायला गेलो तर जसं इतर लोकांना पब्लिकली फेडणं कठीण झालं. तसं त्यांनाही सांगतो वंचितच्या नादी लागू नका. कारण आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sangli Constituency : महाराष्ट्रात आपलं अस्तित्व काँग्रेसने ठरवावं; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?

प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधताना विजय वड्डेटीवार म्हणाले की, साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही त्यांना पसंत केलं होतं. पण त्यांनी का लग्न मोडलं हे त्यांचं त्यांनाच माहीत. कदाचित त्यांना हुंड्यामध्ये जे काही अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळे त्यांनी लग्न मोडलं असावं. त्यांनी याबाबत चर्चा केली पाहिजे होती, असा टोला विजय वडेट्टीवर यांनी लगावला आहे.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर मविआतून बाहेर का पडले?

दरम्यान, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे. आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत. मनोज जरांगेंकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, असं आम्ही मविआला सांगितलं होतं. मात्र, त्यांनी लक्ष दिलं नाही. वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा – MNS : भाजपाला पाठिंबा देताच राज ठाकरेंना धक्का; पदाधिकाऱ्याचा राजीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -