Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : कैरी-लिंबाचं सार

Recipe : कैरी-लिंबाचं सार

Subscribe

उन्हाळयात कैरीपासून अनेक पदार्थ बनवतात. कैरी खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कैरी-लिंबाचं सार कसं बनवायचं हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • एका कैरीचा कीस मिक्सरवर वाटून
  • एका लिंबाचा रस
  • 4 कप पाणी
  • 1/2 वाटी गूळ
  • 4-5 लाल मिरच्या
  • मीठ
  • कढीपत्ता
  • फोडणीसाठी तेल
  • हिंग
  • जिरे

कृती :

Kairiche Saar | Raw Mango Curry Recipe | Kacche Aam Ki Kadhi | कैरीचे सार | कैरीची कढी - YouTube

  • सर्वप्रथम पातेल्यात एक मोठा चमचा तेल घ्या. त्यात मिरच्या, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी द्या.
  • त्यात पाणी घालून उकळी आल्यावर लिंबाचा रस, कैरीचा गर घालावा. गूळ, मीठ घालून उकळावं.
  • तयार टेस्टी कैरी-लिंबाचं सार भातासोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

- Advertisment -

Manini