घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा द्यावा; फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा

Lok Sabha 2024: राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा द्यावा; फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी आज चंद्रपुरमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (Lok Sabha Election 2024 Raj Thackeray should support PM Modi Devendra Fadnavis expressed hope)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, मोदींच्या सभेने भाजपच्या विजयाची अनुकूलता मोठ्या विजयामध्ये परिवर्तित होईल, यामध्ये शंका नाही. पंतप्रधानांच्या दोन सभेमुळे विदर्भाचा भाग ढवळून निघेल. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली. ते पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील, अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंनी 2014 मध्ये मोदींना दिलं समर्थन

मनसे युतीच्या चर्चेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेसोबत गेल्या काही काळात चर्चा झाली आहे. मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यावर त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी 2014 मध्ये मोदींना समर्थन दिलं होतं. मोदी पंतप्रधान व्हावे, अशी राज ठाकरेंची इच्छा होती, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे. त्यासाठी त्यांना विचार करावा लागेल. पण, राज ठाकरेंना देखील आज हे मान्य असेल की, पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षांत जो विकास केला आहे आणि नवीन भारताची निर्मिती झाली आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी मोदींच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे, अशा विचाराने प्रेरित सर्व लोकांनी मोदींसोबत राहायला हवं. मला विश्वास आहे की, राज ठाकरे आणि मनसे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. मला अपेक्षा आहे की, राज ठाकरे यावेळी मोदींना पाठिंबा देतील, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Loksabha election 2024 : पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचे प्रथम प्रशिक्षण संपन्न)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -