घरमहाराष्ट्रNCP SP : जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला राग अन् सुप्रिया सुळेंनी दिलं...

NCP SP : जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला राग अन् सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा प्रचंड राग यायचा, असं जाहीर मेळाव्यात सांगितलं आहे. यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या रागावर उत्तर दिलं आहे.

मुंबई : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहे. तेव्हापासून दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमुळे बारामीत लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघात नणंद-भावजय म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुलगी सुप्रिया सुळे यांच्या लढत होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा प्रचंड राग यायचा, असं जाहीर मेळाव्यात सांगितलं आहे. यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या रागावर उत्तर दिलं आहे. (Lok Sabha Election 2024 NCP SP Jitendra Awhad expressed his anger and Supriya Sule replied ajit pawar)

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने ‘महासभा एकनिष्ठतेची’ या मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे हे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी अजित पवारांचं नाव ने घेता उल्लेख करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बहिणीची नक्कल करणारा पहिला भाऊ महाराष्ट्राने पहिला आहे. सुप्रिया सुळे अजित पवारांना सारखं माझा दादा, माझा दादा करायच्या. पण या गोष्टींचा मला प्रचंड राग यायचा. आता राग शांत झाला आहे. कारण त्यांचं प्रेम बहिणीचं होतं, आपलेपणाचं होतं आणि घर तुटू नये म्हणून होतं. पण अजित पवार यांना ते समजलंच नाही. प्रेम समजायला हृदय लागतं, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – Khichdi Scam : संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार; संजय निरुपम यांचा आरोप

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनीही लगेच उत्तर दिलं. त्यांनी म्हटले की, अजित पवारांना दादा म्हणत असल्याने जितेंद्र आव्हाड माझ्यावर तुटून पडले होते. पण, मी त्यांना एक गोष्ट सांगितली की, नातं तोडणं सोपं असतं पण निभावणं कठीण असतं आणि मी नातं जोडणाऱ्यातली आहे, तोडणाऱ्यातली नाही. त्यामुळे जे आपापल्या वाटेने गेले त्यांना माझ्या शुभेच्छा. प्रत्येकाची काही कारणं असतील, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.

- Advertisement -

सगळे पुरुष माझ्याविरोधात

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सगळे पुरुष माझ्याविरोधात एक झाले आहेत. जसं काय मी ईस्ट इंडिया कंपनी झाली आहे. परंतु मी त्यांच्याविरोधात एकटीने लढते आहे. कारण मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. मोडेन पण वाकणार नाही. त्यामुळे कितीही पुरुष एकत्र येऊ देत, विरोध करू देत, मला काही फरक पडत नाही. पण बारामती मतदारसंघात शरद पवारांना संपवायचं आहे, हा एकच कार्यक्रम विरोधकांनी हाती घेतलेला आहे. हा कार्यक्रम पूर्ण ताकदीने, स्वाभिमानाने आणि सत्याच्या बाजूने आपल्याला हाणून पाडायचा आहे, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना केले.

हेही वाचा – Lok Sabha : 10 वर्षं काम करूनही…; मोदी आणि योगींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर राऊतांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -