आज वर्षातील पहिली संकष्टी असून बाप्पासाठी अनेकजण मोदक बनवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मूग डाळीचे मोदक कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 2 कप मूग डाळ
- 3 कप तांदळाचे पीठ
- 50 ग्राम गूळ
- 1 चमचा वेलची पूड
- 2 मोठे चमचे पीठी साखर
- 1 कप दूध
- चिमुटभर मीठ
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यामध्ये गूळ घालून मध्यम आचेवर 5 मिनिटांपर्यंत ठेवा.
- जेव्हा गूळ पाण्यामध्ये पूर्ण पणे वितळून जाईल तेव्हा अर्धा कप दूध आणि वेलची पूड एकत्र करून मध्यम आचेवर 5 मिनिटांपर्यंत शिजवा.
- आता या मिश्रणामध्ये मूग डाळ आणि एक कप पाणी मिक्स करून भांड्याला झाकूण ठेवा.
- त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेऊन डाळ शिजवून घ्या. आणि गॅस बंद करून हे मिश्रण गार करा.
- आता दुसऱ्या भांड्यामध्ये तांदळाच्या पीठामध्ये साखर आणि मीठ मिक्स करा. गरम पाणी ओतून पीठ मळून घ्या.
- आता त्या पीठाचे छोट्या गोल पुऱ्या करा आणि त्यामध्ये मूगाचे मिश्रण भरा आणि त्याला मोदकाचा आकार द्या.
- अश्या पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्या.
- आता ते मोदक उकडून घ्या.
- तयार मोदक ताटामध्ये काढून बाप्पाला नैवेद्य दाखवा.