घरदेश-विदेशPM Modi : पंतप्रधानच पलटूराम बनले तेथे..., बिहारच्या राजकारणावरून ठाकरे गटाचा घणाघात

PM Modi : पंतप्रधानच पलटूराम बनले तेथे…, बिहारच्या राजकारणावरून ठाकरे गटाचा घणाघात

Subscribe

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या काळात राजकारणाची पातळी कमालीची घसरली आहे. लोकशाही आणि नैतिकता या शब्दांचे पुरते हवन झाले. ईडी, सीबीआयच्या भयाने या काळात भल्याभल्यांनी ‘पलटी’ मारली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पलटी का मारली, हा संशोधनाचा विषय आहे. पण देशावरच पलटूरामांचे राज्य आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पलटूराम बनले तेथे अयोध्येचा राम तरी काय करणार? पलटूरामांपुढे अयोध्येचा रामही हतबलच झाला आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Bihar Politics : भाजपावाले म्हणजे बाजारातले सगळ्यात मोठे खरेदीदार, ठाकरे गटाची टीका

- Advertisement -

देश संकटात असताना नितीश कुमारांसारख्या भरवशाच्या लोकांनी बेइमानी केली याची नोंद इतिहासात कायमची राहील. बिहारात नितीश कुमार, भाजपा, चिराग पासवान वगैरे आता एकत्र येऊन निवडणुका लढवतील, पण भाजपाच्या हुकूमशाहीशी एकाकी लढणारे तेजस्वी यादव, काँग्रेस व इतर लहान पक्षांची आघाडी बिहारातील पलटूरामांचे राजकारण यशस्वी होऊ देणार नाही. तेजस्वी यादव यांना आता अधिक मोकळेपणाने काम करता येईल. बिहारातूनच नव्हे तर देशाच्या क्षितिजावरून नितीश कुमारांचे काळवंडलेले पर्व आता कायमचे नष्ट होत आहे. त्याचे श्रेय भारतीय जनता पक्षाला द्यावे लागेल, अशी टीका सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut on Nitish Kumar : नितीश कुमार मानसिकदृष्ट्या अस्वस्थ, संजय राऊत यांची टीका

- Advertisement -

‘इंडिया’ आघाडीत नितीश कुमार यांचे स्थान मोठे होते. त्यांनीच ‘इंडिया’ आघाडीची सुरुवात केली. मोदी-शहांच्या पकडीतून गुदमरलेला देश वाचवायला हवा, असे नितीश कुमारांचे म्हणणे होते. ते नितीश कुमार शारीरिक व मानसिकदृष्ट्या विकलांग झाल्याचा फायदा आज भाजपने घेतला. अजित पवारांचा 70 हजार कोटींचा घोटाळा स्वतः पंतप्रधान मोदी बाहेर काढतात व नंतर अवघ्या दोन दिवसांत त्याच अजित पवार यांना भाजपासोबत घेऊन उपमुख्यमंत्री करतात. नितीश कुमारांचेही तेच, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -