घरउत्तर महाराष्ट्रपनीर टिक्का, नूडल्स, रस-मलाई अश्या नानाविध मोदकांचा यंदा ट्रेंड

पनीर टिक्का, नूडल्स, रस-मलाई अश्या नानाविध मोदकांचा यंदा ट्रेंड

Subscribe

नाशिक : गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळे गणरायाच्या आगमनाला घरोघरी मोदकांचा नैवेद्य आवर्जून बनवला जातो. बाप्पांप्रमाणेच आपल्यातील प्रत्येकालाच मोदक खायला आवडतो. मात्र, हल्ली मोदकांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध होत असून नाशिकमधील मिठाईच्या दुकानांमध्ये तब्बल 21 प्रकारचे मोदक तयार केले जात आहेत. यात तिखट गोडसह विविध प्रकारच्या मोदकांना नाशिककर पसंती देत आहेत.

बाप्पांच्या आगमनाला घरोघरी मोदकांचा प्रसादही केला जातो. काही गृहिणींनी बाजारातून मोदक आणण्याला पसंती दिली आहे. बाप्पाच्या आवडत्या मोदकाला या काळात मोठी मागणी असते. विशेष म्हणजे खोबर्‍याचे मोदक, उकडीचे मोदक यासोबतच नाशिकच्या काही मिठाई दुकानांमध्ये विविध फलेवरमध्ये मोदक उपलब्ध करून दिले आहे. यात पेरू मोदक, चोकोलावा, रसमलाई, ब्राऊनी, ओरिओ, रेड वेलवेट, हॅझलनट, ब्ल्यू लगून, पान गुलकंद, स्ट्रॉबेरी, पिस्ता, मोतीचूर यांसह अनेक प्रकार दिसून येतायत.

- Advertisement -

एवढंच नाही तर गोड मोदक खाऊन कंटाळा आला तर व्हेज फ्राईड, नूडल्स, समोसा मोदक असे पर्यायही इथे उपलब्ध आहेत. वेगवगेळ्या प्रकारचे मोदक असल्याने नाशिककर पसंती देत आहेत. काही मोदक तयार केले जात आहेत, तर काही मोदक हे ऑर्डर्स प्रमाणे बनवून दिले जात आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विविध प्रकारच्या मोदकांना चांगलीच मागणी आहे. यात पेरू मोदक, चोकोलावा, मोतीचूर, पेरू मोदक, शुगर फ्री मोदक, खजूर नट्स मोदक, मँगो फ्रुटी मोदक, पनीर टिक्का मोदक, चॉकलेट मोदक यांना जास्तीत जास्त मागणी आहे. सध्या शहरातील, अनेक भागातून ऑर्डर्स दिल्या जात आहेत.

२१ प्रकारचे मोदक कोणते?

चोकोलेवा मोदक, ओरिओ मोदक, पान मोदक, मोतीचूर मोदक, शुगरफ्री मोदक, खजूर नट्स मोदक, पीनट जगेरी मोदक, पेरू मोदक, रसमलाई मोदक, चोको बेल्जीयम मोदक, पिस्ता डिलाईट मोदक, ऑरेंज मोदक, मँगो फ्रुटी मोदक, पिझ्झा चिजी मोदक, नूडल्स मोदक, ढोकळा मोदक, मोमोज मोदक, पनीर टिक्का मोदक, समोसा मोदक, उकडी मोदक, फ्राईड मोदक,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -