Eco friendly bappa Competition
घर गणेशोत्सव 2023 गणपती बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा 'असा' आहे इतिहास

गणपती बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा ‘असा’ आहे इतिहास

Subscribe

पौराणिक काळापासून मोदकाचा उल्लेख आढळतो पण मोदकाच्या पाककृतीत याचा विशेष उल्लेख नाही. प्राचीन काळापासून मोद देणारा तो मोदक या अर्थाने लाडवांनाही मोदक म्हटलं जायचं. त्यामुळे तांदळाची उकड, आत खोबरं आणि गुळाचं गोड चूण ही पाककृती मोदक म्हणून कशी प्रचलित झाली हे आज आम्ही सांगणार आहोत.

इसवी सन 750 ते 1200 या कालखंडात उकडीच्या मोदकांसारखा पदार्थ बनू लागल्याचा उल्लेख आढळतो. त्यात तांदळाची उकड समान असली तरी आतलं गोड सारण वेगवेगळ्या पद्धतीनं भरलं जात होतं. नारळाचं चूण आणि उकड असा अचूक उल्लेख एकेठिकाणी आढळतो. पण त्या पदार्थाचा उल्लेख मोदक नाही तर ‘ठडुंबर’ असा केलेला दिसतो.

- Advertisement -

त्यानंतर आहारविषयक ग्रंथात ‘वर्षिल्लक’ नामक पदार्थाची पाककृती अगदी उकडीच्या मोदकांशी मिळती जुळती आहे. आपल्याकडच्या अनेक पाककृती मूळ वेगळ्या नावांसह अस्तित्वात होत्या आणि कालांतरानं त्याच पाककृती भिन्न नावानं प्रसिद्ध झालेल्या दिसतात.

Ukadiche Modak (Steamed Modak) - Kali Mirch - by Smita

- Advertisement -

मोदक ही पाककृती ज्या प्रांतात तांदूळ जास्त पिकतो तेथे ही पाककृती अधिक लोकप्रिय आहे. मात्र थोड्या फार बदलासह या एकाच पाककृतीची नावं‌ बदललेली दिसतात. तमिळ भाषेत ‘मोदक’ किंवा ‘कोळकटै’, मल्याळी भाषेत ‘कोळकटै’, कानडी भाषेत ‘मोदक’ किंवा ‘कडबू’, तेलगू भाषेत ‘कुडुमु’ अशी त्याची अनेकविध नावं आहेत.

प्राचीन काळापासून भारतभरात पुजेसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य वापरला जातो. बारकाईने पाहिलं तर मोदकांचा आकार हा श्रीफलासारखा दिसतो. पुजेतला नारळ आणि गूळ खोबरं यांचा यथोचित संगम साधत कुणा भक्तानं किंवा सुगरणीनं ईश्वराप्रती व्यक्त केलेला कल्पक आणि गोड भक्तीभाव म्हणजे मोदक.

जिथं जे पिकतं तेच नैवेद्याच्या ताटातून ईश्वराला समर्पित केलं जातं. महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उकडीचे मोदक होतात तर विदर्भ, मराठवाडा इथं तळणीचे मोदक होतात. ओला नारळ जिथं मुबलक उपलब्ध तिथं तशाप्रकारे आतलं चूण बनतं. जिथे ओला नारळ नाही तिथं सुक्या खोबऱ्याचा वापरही केला जातो.

उकडीचे मोदक (पाककृती)

आज मोदकाच्या आतल्या सारणाचं वैविध्य लक्षणीयरित्या बदललं आहे. मोदकाचा आकार तोच ठेवत काजू ,आंबा, चॉकलेट, सुकामेवा इतक्या वैविध्यपूर्ण पद्धतीनं मोदक तयार होतात की त्याला दाद द्यायलाच हवी. तरीही गणपती बाप्पा घरी विराजमान झाल्यावर नैवेद्यात पारंपरिक मोदकांचं स्थान अबाधित आहे.

मोदक वळता येणं ही कला आहे. केवळ सगळं साहित्य मोदकाचं आहे म्हणून कसाबसा वळलेला मोदक जिव्हातृप्ती करत नाही कारण हा पदार्थ त्याच्या आकारातून अधिक गंमत आणतो. कळीदार मोदक बनवणे आणि त्याला तुर्रेबाज टोक काढणे ही कला खरंतर वैशिट्यपूर्ण आहे.

काळानुसार मोदकाचे प्रकार बदलत गेले. हल्ली कळीदार मोदक सगळ्यांचा येत असते असे नाही. पण बाप्पासाठी अनेक मंडळी बाजारातून का होईना मोदक खरेदी करताना पाहायला मिळतात. अशातच मोदकांचे चवीनुसार बरेच प्रकार आहेत. यातले काही महत्वाचे प्रकार आपण जाणून घेणार आहोत.

________________________________________________________________________

हेही वाचा : लाडक्या बाप्पासाठी मोदकांच्या पाककृती

 

- Advertisment -