घरमहाराष्ट्रAjit Pawar: 'हा आमचा अंतर्गत प्रश्न...; थोडा वेळ तर द्या', भुजबळांच्या भूमिकेवर...

Ajit Pawar: ‘हा आमचा अंतर्गत प्रश्न…; थोडा वेळ तर द्या’, भुजबळांच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, भुजबळांच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

कोल्हापूर: मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही सरकारकडून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हा ओबीसी समाजावर अन्याय असल्याचं म्हणत, तीव्र प्रतिक्रिया दिल्या. याच संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोल्हापूरमधील विकासकामांबाबत चर्चा केली तसंच, अनेक विषयांवरही भाष्य केलं. (Ajit Pawar Given Statement on Minister Chhagan Bhujabal’s Reaction on government’s decision on Maratha Reservation)

भुजबळांशी बोलण्यासाठी थोडा वेळ द्या..

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला फसवल्याची टीका केली आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांना विरोध करणारा मंत्री बरखास्त करा, असंही म्हटलं आहं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचाळवीर लोकांच्या प्रश्ननाला उत्तर देण्यास बांधील नसल्याचं म्हटलं.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका ही योग्य आहे. त्या परिस्थितीवर मार्ग काढण्याचा तो प्रयत्न आहे. तसंच, अध्यादेश देतानाही मुख्यमंत्री म्हणाले होते की, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जाणार आहे. तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं आहे की, कोणत्याही समाजावर अन्याय केला जाणार नाही, त्यामुळे सरकारची भूमिका न्याय देणारी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भुजबळांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, घरातील दोन भावांमध्येही वाद होतात. मात्र त्यावर बसून मार्ग काढला जातो. मराठा आरक्षणाबाबत काही जणांना, हे थांबावं असं वाटत नसावं, म्हणून ते काही जण असं बोलत असतील. मी सगळ्यांना उत्तर द्यायला बांधील नाही.

- Advertisement -

(हेही वाचा: PM Modi : पंतप्रधानच पलटूराम बनले तेथे…, बिहारच्या राजकारणावरून ठाकरे गटाचा घणाघात )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -