घरगणेशोत्सव 2022गणेशोत्सव 2022 : मोदकम् समर्पयामि... बाप्पासाठी घरच्या घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक

गणेशोत्सव 2022 : मोदकम् समर्पयामि… बाप्पासाठी घरच्या घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक

Subscribe

गणपती बाप्पाला मोदक सर्वात प्रिय आहेत. त्यामुळेच या गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'हे' सोप्या प्रकारचे मोदक नक्की बनवा.

मंडळी गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस राहिले आहेत. ३१ तारखेला प्रत्येकाच्याच घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे.गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुद्धा सुरु प्रत्येक घरात सुरु झाली आहे. गणपतीची आरास, पूजा या सोबतच बाप्पाच्या नैवेद्याचीही तयारी प्रत्येकाकडे सुरु होते. गणपती बाप्पाला मोदक सर्वात प्रिय आहेत. त्यामुळेच या गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी ‘हे’ सोप्या प्रकारचे मोदक नक्की बनवा.

हे ही वाचा – Ganesh Chaturthi 2022 : बाप्पाचा शुभाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अर्पण करा ‘या’ 5 गोष्टी

- Advertisement -

1) नो कूक रोज लफेव्हर मोदक

- Advertisement -

साहित्य – पाव किलो मिल्क पावडर, एक कप डेसिकेटेड कोकोनट, दोन चमचे गुलकंद, पाव कप रोज सिरप, सुका मेवा आणि टूटीफ्रूटी

कृती – सुका मेवा,गुलकंद आणि टूटीफ्रूटी एकत्र मिक्स करून त्याचे सारण बनवून घ्या. डेसिकेटेड कोकोनट मध्ये मिल्क पावडर आणि रोज सिरप घालून ते एकत्र मिक्स करून घ्या मोदकांच्या साच्यामध्ये मिश्रण घालून त्यात गुलकंदाचं सारण भरा.

2) शुगर फ्री पंचखाद्य मोदक

साहित्य – पाव कप सुका मेवा, एक कप सीडलेस खजूर, पाव कप सुकं किसलेलं खोबरं आणि पाव चमचा साजूक तूप

कृती – एका भांड्यात तूप गरम करून त्यात खस खस भाजून घ्या. त्या नंतर खस खस भाजून झाली की त्यात खजूर घालून ते मिश्रण मऊ होईपर्यंत परतून घ्या. त्या मिश्रणात किसलेलं खोबरं आणि सुका मेवा घालून ते मिश्रण पुन्हा एकत्र मिक्स करून घ्या आणि गॅस गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर मोदक साच्यात भरून सुरेख मोदक तयार केला.

हे ही वाचा – कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत अशा पद्धतीने साजरा केला जातो गणेशोत्सव

3) मावा चॉकलेट मोदक

साहित्य – १५० ग्रॅम पिठी साखर, १५० ग्रॅम डार्क चॉकलेट आणि २५० ग्रॅम खावा.

कृती – एका पॅन मध्ये खावं घेऊन त्याला हलकासा सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या. खवा व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात किसलेले चॉकलेट घाला आणि पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण थंड झालं की त्यात पिठी साखर घाला. चॉकलेट साच्यामध्ये मिश्रण घालून मोदक बनवा.

4) नो कूक काजू मोदक

साहित्य – एक कप पिठी साखर, अर्धा कप मिल्क पावडर, एक कप काजू, चार चमचे पाणी आणि पाव चमचा रोज इसेन्स

कृती – सर्वात आधी काजूची पूड करून घ्या. मिल्क पावडर, काजू पूड आणि पिठी साखर एकत्र मिक्स करून घ्या. हे मिश्रण मायक्रोव्हेव्ह मध्ये तीन मिनिटांपर्यंत गरम करून घ्या किंवा पॅन मध्ये भाजून घ्या. मिश्रण थंड झालं की पाणी आणि रोज इसेन्स घालून ते मिश्रण एकत्र करून त्याचा गोळा करा. ते मिश्रण मोदकाच्या साच्यात घालून मोदक करून घ्या.

हे ही वाचा –  31 ऑगस्ट रोजी कधी कराल गणेश मूर्तीची स्थापना? जाणून घ्या शुभमुहूर्त

 

सर्व पाककृती सौजन्य – मधुरा बाचल

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -