Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenRecipe : संकष्टीनिमित्त बनवा मूग डाळीचे मोदक

Recipe : संकष्टीनिमित्त बनवा मूग डाळीचे मोदक

Subscribe

आज वर्षातील पहिली संकष्टी असून बाप्पासाठी अनेकजण मोदक बनवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मूग डाळीचे मोदक कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 2 कप मूग डाळ
  • 3 कप तांदळाचे पीठ
  • 50 ग्राम गूळ
  • 1 चमचा वेलची पूड
  • 2 मोठे चमचे पीठी साखर
  • 1 कप दूध
  • चिमुटभर मीठ

कृती :

Moong dal modak Recipe by Kuldeep Kaur - Cookpad

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यामध्ये गूळ घालून मध्यम आचेवर 5 मिनिटांपर्यंत ठेवा.
  • जेव्हा गूळ पाण्यामध्ये पूर्ण पणे वितळून जाईल तेव्हा अर्धा कप दूध आणि वेलची पूड एकत्र करून मध्यम आचेवर 5 मिनिटांपर्यंत शिजवा.
  • आता या मिश्रणामध्ये मूग डाळ आणि एक कप पाणी मिक्स करून भांड्याला झाकूण ठेवा.
  • त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेऊन डाळ शिजवून घ्या. आणि गॅस बंद करून हे मिश्रण गार करा.
  • आता दुसऱ्या भांड्यामध्ये तांदळाच्या पीठामध्ये साखर आणि मीठ मिक्स करा. गरम पाणी ओतून पीठ मळून घ्या.
  • आता त्या पीठाचे छोट्या गोल पुऱ्या करा आणि त्यामध्ये मूगाचे मिश्रण भरा आणि त्याला मोदकाचा आकार द्या.
  • अश्या पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्या.
  • आता ते मोदक उकडून घ्या.
  • तयार मोदक ताटामध्ये काढून बाप्पाला नैवेद्य दाखवा.

हेही वाचा : 

Recipe : टेस्टी तंदूरी आलू टिक्की

- Advertisment -

Manini