Wednesday, May 1, 2024
घरमानिनीFashionतुम्ही shapewear वापरता? मग व्हा वेळीच सावध

तुम्ही shapewear वापरता? मग व्हा वेळीच सावध

Subscribe

आजकाल बहुतांश महिला आपले वाढलेले पोट लपवण्यासाठी आणि स्लिम दिसण्यासाठी बॉडी शेपरचा वापर करतात. तर काहीजण याचा वापर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खुप वेळ घालतात. शेपवेयर हे विविध प्रकारच्या फॅब्रिक आणि विविध आकारात उपलब्ध असतात. ते अधिक स्ट्रेचेबल असल्याने सहज अंगाला चिकटले जातात. मात्र तुम्हाला बेली शेपरचा वापर केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल माहितेय का? खरंतर याचा दररोज वापर केल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. (Shapewear Affects Overall Health)

शेपवेअरमुळे होऊ शकतात या समस्या
-दररोज तुम्ही शेपवेअर खुप वेळ घालून ठेवत असाल तर तुमच्या नसा या संकुचित होऊ शकतात. जेव्हा असे होते तेव्हा तुमच्या शेपरच्या आसपासच्या ठिकाणी सुन्न झाल्यासारखे जाणवेल. अशातच तुम्ही तुमचे शेपवेअर अॅडजेस्ट करुन पहा. असे केल्यानंतर ही काही होत नसेल तर शेपवेअर काढा. या व्यतिरिक्त तुम्ही विविध आकाराचे किंवा कट असलेले शेपवेअर घालू शकता.

- Advertisement -

-व्यवस्थितीत फिटिंग होत नसलेले शेपवेअर घालत असाल तर तुमच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे समस्या उद्भवू शकते. तुमच्या रक्ताभिसरणाची क्षमता कमी झाल्यास ब्लड क्लॉट्स तयार होऊ शकतात. खासकरुन जर तुम्ही मधुमेह किंवा हृदय रोगाचे रुग्ण असाल.

- Advertisement -

-जर तुम्ही खुप वेळ शेपवेअर घातले तर पचनासंबंधित समस्या उद्भवू शकते. अधिक घट्ट शेपवेअरमुळे पोटावर दाब निर्माण होतो. अशा स्थितीत तुमची पचनक्रिया सुद्धा मंदावते. परिणामी गॅस आणि सूज येण्यासारखी समस्या उद्भवू शकते. ऐवढेच नव्हे तर शेपवेअरमुळे वारंवार लघवीला सुद्धा होऊ शकते.

-काही शेपवेअर असे असतात जे पँन्टच्या आकारात येतात. अशातच पोटात खेचल्यासारखे होते. त्याचसोबत योनिचा येथील भाग ही ब्लॉक होतो.त्यामुळे तेथपर्यंत हवा पोहचत नाही. अशातच यीस्ट इंन्फेक्शनचा धोका वाढतो. यीस्ट इंन्फेक्शन योनि किंवा आसपासच्या त्वचेवर होऊ शकते.

-शेपवेअर घातल्याने घाम ही येतो. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच दीर्घकाळ घातल्याने प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी जळजळ ही होऊ शकते.


हेही वाचा- High Heels घालताना समस्या येत असल्यास ‘या’ टीप्स करा फॉलो

- Advertisment -

Manini