घरदेश-विदेशईडीच्या संचालकांचा कार्यकाळ वाढविण्यावर केंद्र आग्रही, पण सर्वोच्च सुनावणीनंतर उठणार पडदा

ईडीच्या संचालकांचा कार्यकाळ वाढविण्यावर केंद्र आग्रही, पण सर्वोच्च सुनावणीनंतर उठणार पडदा

Subscribe

31 जुलै रोजी कार्यकाळ संपत असलेल्या संजय मिश्रा यांच्या प्रकरणावर 27 जुलै रोजी सुनावणी होणार

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाचे (Enforcement Directorate) संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवावा या मागणी आग्रही असलेल्या केंद्र सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 31 जुलै रोजी कार्यकाळ संपत असलेल्या संजय मिश्रा यांच्या प्रकरणावर 27 जुलै रोजी सुनावणी होणार असून, त्यानंतर या प्रकरणावरील पडदा उठणार आहे.

सक्तवसुली संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांनी 31 जुलैपर्यंत पदमुक्त व्हावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्देशाचे पालन करणे अनिवार्य असतानाच आता पुन्हा संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा या यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र, या प्रकरणावर 27 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

याआधीच दिले होते कार्यकाळ न वाढविण्याचे निर्देश
2018 मध्ये संजय मिश्रा हे ईडीचे संचालक म्हणून नियुक्त झाले होते. त्यांचा कार्यकाळ हा 2020 मध्ये समाप्त होणार होता. मात्र, केंद्र सरकारने त्यांना एक वर्षाची सेवा मुदत वाढ दिली. स्वयंसेवी संस्था ‘कॉमन कॉज’ने सुप्रीम कोर्टात या मुदतवाढीला आव्हान दिले होते. 8 सप्टेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले की, मिश्रा यांचा विस्तारीत कार्यकाळ 18 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता दखल दिली जाणार नाही. मात्र, त्यांचा कार्यकाळ या पुढे वाढवण्यात येऊ नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने याआधीचे दिले होते.

हेही वाचा : Pune crime : ‘त्या’ दहशतवाद्यांनी केला होता सातारा, कोल्हापुरात बॉम्ब फोडण्याचा सराव

- Advertisement -

कोण आहेत संजयकुमार मिश्रा?
संजय मिश्रा हे 1984 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी (IRS) आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये, संजय मिश्रा यांना ईडीचे संचालक बनवण्यापूर्वी त्यांना तीन महिन्यांसाठी अंतरिम संचालक बनवण्यात आले होते. मिश्रा यांना आर्थिकतज्ज्ञ देखील म्हटले जाते आणि त्यांनी आयकराच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच त्यांची ईडी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ईडीचे प्रमुख बनण्यापूर्वी मिश्रा यांची दिल्लीतील आयकर विभागात मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा : आज कारगिल विजय दिवस : वीरांच्या पराक्रमांची गाथा म्हणजे कारगिल विजय दिन-मोदी

संजय मिश्रांसाठी केंद्र सरकार आग्रही का?
संजय मिश्रा यांना 19 नोव्हेंबर 2018 मध्ये दोन वर्षांसाठी ईडीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये मिश्रा पदमुक्त होणार होते. त्याआधीच मे महिन्यात त्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केली. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी त्यांचा कार्यकाळ दोनऐवजी तीन वर्षांचा करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) अधिनियम अंतर्गत एक सुधारणा अध्यादेश जारी केला. त्यानुसार, संजय मिश्रा यांचा कार्यकाळ 18 नोव्हेंबर 2023 रोजी संपणार होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -