घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : सरकार आणण्यासाठी खोके आहेत मग आशा सेविकांसाठी का नाही?...

Uddhav Thackeray : सरकार आणण्यासाठी खोके आहेत मग आशा सेविकांसाठी का नाही? ठाकरेंचा थेट सवाल

Subscribe

अंगणवाडी आशा सेविकांचे येथील आझाद मैदानात आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला असून, आझाद मैदानातून ठाकरेंनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले.

मुंबई : सरकार आणण्यासाठी खोके आहेत पण माझ्या अंगणवाडी आणि आशा ताईंच्या मेहनतीला, त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला मानधन द्यायला पैसे नाहीत तेव्हा हे सरकार तुमचं वाटतं का? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर टीकास्त्र सोडलं. ते आज बुधवारी (3 जानेवारी) आझाद मैदानातून बोलत होते. (Uddhav Thackeray There are boxes to bring the government so why not Asha for sevaks Thackerays direct question)

अंगणवाडी आशा सेविकांचे येथील आझाद मैदानात आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला असून, आझाद मैदानातून ठाकरेंनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले.

- Advertisement -

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही. परंतु एकाच सांगतोय भाजपला मत द्यायचं नाही. हा तुम्हाला योग्य वाटत असेल तर जरूर द्या. मध्य प्रदेशमध्ये भाजप निवडणूक जिंकले, सगळ्यांचा असा अंदाज होता की, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा भाजपा हरणार. पण ते जिंकले, जिंकल्यानंतर त्यांनाच कळेना कसं जिंकलो? काही म्हणतात EVM मुळे जिंकले. पण जी कारणमीमांसा झाली त्याच्यात एक कारण आलं की लाडली बैना योजना तेथील महिलांसाठी सरकारने राबवली. तेथे महिला लाडली बहिणा तर येथील या सगळ्या भगिनी आहेत त्या काय लाडल्या नाहीत का? या महिला पण रामभक्त आहेत, या महिला हिंदू आहेत की नाही? हिंदू असतील, मुसलमान असतील, काहीही असतील पण आज महाराष्ट्रातील तळागळापर्यंत कोण जातं? Coronaमध्ये घरोघरी जाऊन या महिलांनी सेवा दिली. याची मला जाणीव आहे. आणि म्हणून मी फार काही करू शकलो नसलो तरी न थांबता मानधन वेळेवर मिळालंच पाहिजे. असा माझ्या मंत्रिमंडळाने एक निर्णय होता. त्यामुळे अनेकाना दिलासा मिळाला होता. आणि जर सरकार गेलं नसतं तर जे काही प्रश्न आहेत ते सोडवले असते असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

आता तुम्ही विचारलात की महा वृद्धापकाळी खायचं काय? जगायचं कसं? अरे जिथे लहान मुलांचा श्रीगणेशा गिरवणाऱ्या तुम्ही तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते. मग कोणाचं सरकार आहे? कोणासाठी चाललेलं आहे? आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोडक्यावरती बसवतोय? हा सुद्धा एक विचार करायला पाहिजे असेसुद्धा यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Sunil Kedar यांच्या जामीन अर्जावर 9 जानेवारीला सुनावणी, नागपूर खंडपीठाची सरकारला नोटीस

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आशाताई सेविकांच्या हातात काय ताकद आहे हे अजून सरकारला कळालेली नाही. जे हात जनतेची सेवा करतात ते हात जर एकमेकावरती आपटले तर एवढा आवाज होतो आणि तेच हात सरकारच्या कानाखाली आपटले तर केवढा आवाज होईल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.

हेही वाचा : Prakash Ambedkar : काँग्रेसने बिहारमध्ये 5 पेक्षा अधिक जागा लढवू नयेत, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

तुमचं सरकार टीकेल का याचा विचार करा

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं की मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो अशी बोळवण करतात. पण पुढील अधिवेशनापर्यंत तुमचं सरकार असणार का? सरकार राहील का? तुम्हाला दिल्लीवरून जसे आदेश येतात तसं करावं लागतं असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -