घरक्राइमविमानातून सोनं चोरलं! लंडन-मुंबई फ्लाइटमध्ये तब्बल साडेसात लाखांच्या सोन्यावर डल्ला

विमानातून सोनं चोरलं! लंडन-मुंबई फ्लाइटमध्ये तब्बल साडेसात लाखांच्या सोन्यावर डल्ला

Subscribe

पुणे : बस, रेल्वे आणि गर्दीतून चोरी होण्याच्या घटना वारंवार आपल्याला ऐकायला मिळतात. पण विमानात चोरी झाल्याचे सांगितले तर त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. पण लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानात चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीचे तब्बल साडेसात लाख रुपयांचे सोने चोरीला गेले आहेत. ही घटना 1 ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये लंडन ते मुंबई या विमानप्रवासात घडली असून याप्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (The gold was stolen from the plane Gold worth seven and a half lakhs was stolen in the London Mumbai flight)

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कामत हे संगणक अभियंता असून ते लंडन येथे एका कंपनीत काम करतात. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एका नातेवाइकाच्या लग्नासाठी त्यांनी 1 ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये लंडन ते मुंबई असा प्रवास जेट्टी विमानाने केला. यावेळी त्यांनी चार पिशव्यांमध्ये त्यांनी कपडे, अत्तर, चॉकलेट, इलेक्ट्रिक उपकरणे आणि 152 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे सामाना सोबत घेतले होते. मात्र लंडन येथून निघताना त्यांनी त्यांच्या सामानाच्या चार पिशव्या सीलबंद न करता सौदी एअरलाईन्सकडे दिल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – Jitendra Awhad : एकनाथ शिंदे यांनी मला ‘ती’ गोष्ट स्वत:हून सांगितली; अजितदादांबाबत आव्हाडांचा गौप्यस्फोट

सचिन कामत जेव्हा मुंबई विमानतळावर पोहेचले तेव्हा त्यांना त्यांच्या चार पिशव्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी पिशव्यांचे ओळखपत्र मुंबई विमानतळावर जमा केले. त्यानंतर एका कुरिअर कंपनीद्वारे त्यांना त्यांच्या पिशव्या वाकड येथे मिळाल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या पिशव्या तपासल्या असत्या त्यांना 152 ग्रँम वजनाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे समजते. या दागिन्यांची किंमत 7 लाख 60 हजार एवढी आहे. दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट वाकड पोलीस स्टेशन गाठले आणि दागिने चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी करत आहेत.

- Advertisement -

सचिन कामत यांनी तक्रारीत काय म्हटले?

सचिन कामत यांनी तक्रारीत म्हटले की, मी व माझी पत्नी काजल आणि विभा व गार्गी या दोन मुलींसह लंडन ते मुंबई वाया जेड्डा असा प्रवास विमान नंबर SV114, SV770 यांनी करत मुंबईत आलो. आम्ही दिनांक 09/12/2023 रोजी दुपारी 2 वाजता लंडनहून निघालो आणि दिनांक 11/12/2023 रोजी रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी मुंबईत पोहचलो. आम्ही लंडन येथून येत असताना सामानाच्या चार बॅगा पॅक केल्या मात्र सिलबंद न करता सौदिया एअरलाईन्सकडे दिल्या होत्या. या चार बॅगांमध्ये आम्ही आमचे कपडे, अत्तर, चॉकलेट, इलेक्ट्रीक उपकरणे तसेच 152 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्यांची किंमत 7 लाख 60 हजार आहे हे सर्व ठेवले होते. मुंबईत उतरल्यावर आम्हाला आमच्या बॅगा मुंबई येथील विमानतळावर मिळाल्या नाहीत.

हेही वाचा – “आमच्याकडे देखील जालीम डोस…” Sanjay Raut यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला BJPचे प्रत्युत्तर

प्लॅस्टीक टेंगने सिलबंद असतानाही बॅगेतून दागिने चोरीला

सचिन कामत म्हणाले की, आम्ही आमच्या गायब झालेल्या बॅगांचे आयडी क्रमांक मुंबई विमातळावर जमा केले. यानंतर मुंबई, अंधेरी इस्ट, संतोषी माता नगर येथील यश कार्गो यांच्या माध्यमांतून आम्हाला आमच्या चारही बॅगा पुण्यात प्लॅस्टीक टेंगने सिलबंद मिळाल्या. आम्ही बॅगांचे सिल तोडून सामना तपासले असता त्यात सोन्याचे दागिने मिळाले नाहीत. ते लंडन ते मुंबई सहारा एअरपोर्ट वाया जेड्डा आणि मुंबई ते पुणे दरम्यान अज्ञात इसमाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चोरल्याची खात्री झाली आहे. त्यामुळे मी माझ्या चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र मला सोन्याची दागिने मिळून न आल्याने मी माझ्या घरच्यांशी विचारविनिमय करून तक्रार देण्याकरीता पोलीस स्टेशन येथे आलो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -