घरदेश-विदेशManipur Violence: मणिपूरमध्ये महिलांचा मुख्यमंत्र्यांविरोधात मशाल मोर्चा, सरकारकडे केली 'ही' मागणी

Manipur Violence: मणिपूरमध्ये महिलांचा मुख्यमंत्र्यांविरोधात मशाल मोर्चा, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Subscribe

बुधवारी (17 जानेवारी) महिला आंदोलकांनी मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात राजधानी इंफाळमध्ये मशाल रॅली काढली.

Manipur Violence Latest News: बुधवारी (17 जानेवारी) महिला आंदोलकांनी मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात राजधानी इंफाळमध्ये मशाल रॅली काढली. यावेळी त्यांनी राज्यातील (गेल्या वर्षापासून) वाढत्या हिंसाचाराचा निषेध करून राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या शासकीय निवासस्थानाकडे मोर्चा काढला. तेंगनौपल जिल्ह्यातील भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाल्यानंतर रॅली काढण्यात आली. (Manipur Violence Women s torch march against the Chief Minister in Manipur this is a big demand from the government)

मीरा पायबी संघटनेशी संबंधित या महिला मालोम, केशमपत आणि क्वाकीथेल भागातून आल्या होत्या आणि त्यांनी रॅलीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी आंदोलक महिलांनी मुख्यमंत्री सचिवालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले.

- Advertisement -

SOO करार रद्द करा- आंदोलक महिलांची मागणी

आंदोलकांनी मोरेह आणि मणिपूरच्या इतर भागात अलीकडील गोळीबाराच्या घटनांचा निषेध केला आणि अतिरेकी संघटनांसोबत सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (SOO) करार रद्द करण्याची मागणी केली. अतिरेकी गटांशी राजकीय चर्चा सुरू करण्याच्या उद्देशाने 22 ऑगस्ट 2008 रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

मोरे येथे 2 जवानांच्या हत्येबद्दल नाराजी

17 जानेवारीला पहाटे 4 वाजता मोरे येथील चिकीम गावावर सशस्त्र अतिरेक्यांनी डोंगराळ भागात हल्ला केला. हा हल्ला झाला तेव्हा सैनिक झोपले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारला तेंगनौपालमध्ये अशांततेच्या शक्यतेची माहिती मिळाली होती, त्यानुसार सरकारने 16 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजता या भागात कर्फ्यू लागू केला होता. त्यानंतर हल्ला झाला त्यामुळे राज्य सरकारविरोधात प्रचंड नाराजी पसरली होती.

- Advertisement -

मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत 180 हून अधिक लोकांचा मृत्यू

खरं तर, गेल्या वर्षी 3 मे रोजी, खोरे-बहुल मेईतेई आणि टेकडी-बहुल कुकी यांच्यात जातीय संघर्ष झाला, त्यानंतर मणिपूरमध्ये तुरळक हिंसाचार सुरूच आहे. आतापर्यंत या हिंसाचारात 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत.

(हेही वाचा: #BoycottMaldives भारत-मालदीवचे कसे आहेत राजकीय संबंध? | #Lakshadweep #Maldives #Modi )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -