घरमहाराष्ट्रBMC Election : 'मर्दा'सारखे मैदानात या..., आशिष शेलार यांचे ठाकरे गटाला प्रतिआव्हान

BMC Election : ‘मर्दा’सारखे मैदानात या…, आशिष शेलार यांचे ठाकरे गटाला प्रतिआव्हान

Subscribe

मुंबई : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने तीन राज्यांमध्ये निर्विवाद बहुमत मिळविले. काँग्रेसने तेलंगणा राज्यात विजय मिळविला असला तरी, तिच्या हातून राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमधील सत्ता गेली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, मुंबई महानगरपालिका निवडणूक घेण्याचे आव्हान दिले आहे. त्याला मुंबई भाजपाचे अध्यक्ष Adv. आशिष शेलार यांनी प्रतिआव्हान दिले आहे.

हेही वाचा – Pankaja Munde : आरक्षणाचा प्रश्न सोडवा, लोक दारात येऊन आशीर्वाद देतील; पंकजा मुंडेचा सरकारला सल्ला

- Advertisement -

मुंबईत नरिमन पॉईंट येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ‘शिवालय’ या राज्य संपर्क कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांनी आज, मंगळवारी केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर टीका केली. पाच राज्यांच्या निवडणूका झाल्या, भाजपाला भरपूर यश मिळाले. पण त्यांना माझे आव्हान आहे की, आधी मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या, असे ते म्हणाले.

- Advertisement -

याला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक झालीच पाहिजे, लवकर झाली पाहिजे, या आपल्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणूनच तुम्ही वॉर्ड रचनेबाबत आपले बगलबच्चे राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी केलेल्या याचिका मागे घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : राम मंदिराच्या लोकार्पणामुळे…; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर

तसेच, तुम्ही जे घालवले आहे, त्या ओबीसीच्या आरक्षणाची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचा निकाल न लागता, ओबीसींना आरक्षण न देता तुम्हाला निवडणुका हव्या आहेत का? आमच्या ओबीसींच्या पाठीत असा खंजीर खुपसणार का? असा छुपा अजेंडा घेऊन का येताय? ‘मर्दा’सारखे मैदानात या. भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला हरवण्यासाठी पूर्ण ताकदीने सज्ज आहेत, असे प्रतिआव्हान देतानाच, तुमचे बोलघेवडे आणि आमचे ध्येयवेडे अशी लढत होऊनच जाऊ द्या. लक्षात ठेवा विजय नेहमी ध्येयवेड्यांचाच होतो, असे आमदार शेलार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : बॅलेट पेपरवर एकच निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -